शिधापत्रिका संगणकीकरणाला वेग; कोकण विभागात ८0 टक्के काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 23:15 IST2018-11-17T23:15:23+5:302018-11-17T23:15:54+5:30
धान्य वाटपामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी राज्य शासनाने शिधापत्रिकांचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिधापत्रिका संगणकीकरणाला वेग; कोकण विभागात ८0 टक्के काम पूर्ण
नवी मुंबई : धान्य वाटपामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी राज्य शासनाने शिधापत्रिकांचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामाने कोकण विभागात वेग घेतला आहे. संगणकीकरणाचे ८0 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित शिधापत्रिकांचे संगणकीकरण करण्यासाठी तालुका स्तरावर मोहीम तीव्र करण्यात आल्याची माहिती कोकण विभागीय पुरवठा विभागाचे उपायुक्त दिलीप गुट्टे यांनी दिली.
त्याअनुषंगाने सर्व शिधापत्रिका आरसीएमएस या पोर्टलवर संगणकीकृत करून त्याचे वेळोवेळी अपडेशन करण्याचे काम सुरू आहे. यात मुख्यत: अंत्योदय शिधापत्रिका आणि धान्य कुटुंब शिधापत्रिका यांच्यात मेळ घालण्याचा राज्य सरकारचा उद्देश आहे. धान्यवाटपात पारदर्शकता आणण्याकरिता पात्र लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकेचे १00 टक्के संगणकीकरण करून या संगणकीकृत शिधापत्रिकाधारकांना एफपीएस आॅटोमिशन प्रकल्पांतर्गत (इ-पोस ) मशिनद्वारे लाभार्थींना धान्यवाटप करण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यात २0१८ पासून आधार संरक्षण सार्वजनिक वितरण प्रणाली लागू करण्यात आली आहे. मागील सहा महिन्यात कोकण विभाग ८0 टक्के धान्य ई-पोस मशिनद्वारे वितरीत करण्यात येत आहे. उर्वरित २0 टक्के धान्य वितरण आॅफलाइनने केले जात आहे. एकंदरीत आॅनलाइनद्वारे वितरणाचे १00 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचा विभागाचा प्रयत्न असल्याचे गुट्टे यांनी सांगितले.
वाहतुकीवर नियंत्रण
शासनाकडून प्राप्त होणारा सर्व धान्य कोटा स्वस्त भाव दुकानापर्यंत पोहचवण्याची संपूर्ण संगणकीकृत प्रक्रि येचा सुध्दा या प्रणालीत समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या शासकीय गोदामातून होणारी धान्य वाहतूक हा पहिला टप्पा आणि तालुका गोदामातून दुकानापर्यंत दुसरा टप्पा असणार आहे.