प्रिंटिंग, पॅकेजिंगवर बेलापूरमध्ये विशेष कार्यशाळा

By Admin | Updated: July 8, 2017 06:04 IST2017-07-08T06:04:32+5:302017-07-08T06:04:32+5:30

टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेस आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘कमवा आणि शिका’ या

Special workshops in Belapur, printing, packaging | प्रिंटिंग, पॅकेजिंगवर बेलापूरमध्ये विशेष कार्यशाळा

प्रिंटिंग, पॅकेजिंगवर बेलापूरमध्ये विशेष कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेस आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘कमवा आणि शिका’ या योजनेंतर्गत ३ वर्षांचा ‘प्रिंटिंग अ‍ॅण्ड पॅकेजिंग’ हा १२वी नंतरचा अभ्यासक्र म लवकर सुरू होणार आहे. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अंधेरी (प), जुहू गल्ली येथील कार्यालयात हा पदवी अभ्यासक्र म २०१६पासून सुरू झाला आहे. पाच दिवस प्रिंटिंग आणि पॅकेजिंग उद्योगात थेट प्रशिक्षण आणि एक दिवस संस्थेच्या अंधेरी येथील कार्यालयात वर्ग, असे या अभ्यासक्रमाचे स्वरूप आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेस तर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती देण्यासाठी एका कार्यशाळेचे आयोजन शनिवार, ८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता गौरव म्हात्रे कला केंद्र, सेंट्रल लायब्ररी बिल्डिंग, वायएमसीए जवळ, सेक्टर-४, सीबीडी बेलापूर येथे केले आहे. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष रणजित चव्हाण आणि महासंचालक आशिष देवस्थळी यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या कार्यशाळेत प्रिंटिंग अ‍ॅण्ड पॅकेजिंग या विषयावर तज्ज्ञ मुकुल कुलकर्णी, ‘लोकमत’चे संपादक विनायक पात्रुडकर आणि उत्पादन व्यवस्थापक विश्वास गवळी मार्गदर्शन करणार असल्याची माहिती संस्थेचे सल्लागार सुनील वेलणकर यांनी दिली. ही कार्यशाळा मोफत असून, इच्छुकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वेलणकर यांनी केले आहे.

Web Title: Special workshops in Belapur, printing, packaging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.