शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

शहरात ‘स्पेशल छब्बीस’चे रॅकेट उघडकीस; बोगस संस्थेसाठी गमावल्या नोक-या, अनेकांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 3:34 AM

केंद्र सरकारची संस्था असल्याचे समजून अनेकांनी बोगस संस्थेपायी नोकºया गमावल्याचा प्रकार समोर आला आहे. बोगस संस्थेच्या माध्यमातून होत असलेल्या फसवणुकीच्या तक्रारीआधारे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. चौकशीत त्यांनी ८ ते १० हजार रुपये घेऊन ५०हून अधिकांना बोगस संस्थेत नोकरीला लावल्याचे उघड झाले.

- सुर्यकांत वाघमारेनवी मुंबई : केंद्र सरकारची संस्था असल्याचे समजून अनेकांनी बोगस संस्थेपायी नोकºया गमावल्याचा प्रकार समोर आला आहे. बोगस संस्थेच्या माध्यमातून होत असलेल्या फसवणुकीच्या तक्रारीआधारे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. चौकशीत त्यांनी ८ ते १० हजार रुपये घेऊन ५०हून अधिकांना बोगस संस्थेत नोकरीला लावल्याचे उघड झाले.‘स्पेशल छब्बीस’ या हिंदी चित्रपटाच्या कथेप्रमाणे पनवेलमधील अनेक कंपन्यांमध्ये बनावट छापे पडल्याचे समोर आले आहे. दोघा व्यक्तींनी सुशिक्षित तरुणांची दिशाभूल करून त्यांच्या माध्यमातून हे छापे टाकले आहेत. मात्र, अनेक ठिकाणी अशा कारवाई करणाºया संस्थेच्याच कार्यालयावर खºया पोलिसांचा छापा पडल्यानंतर ती संस्थाच बोगस असल्याचे तिथे नोकरी करणाºया तरुणांच्या लक्षात आले. मागील काही महिन्यांपासून पनवेल परिसरात क्राइम इंटेलिजन्स फोर्स व इंटेलिजन्स इनव्हेस्टिगेशन एजन्सी नावाच्या संस्थेचा सुळसुळाट होता.सदर संस्था केंद्र सरकारची असून, त्या संस्थेचे प्रमुख पदाधिकारी असल्याच्या थाटात महेश मधुकर भडके (२५) व उमेश लक्ष्मण मोहिते (३२) हे परिसरात वावरत होते. शिवाय त्यांनी या संस्थेत नोकरीचे आमिष दाखवून ५०हून अधिक तरुणांकडून ८ ते १० हजार रुपये घेऊन त्यांना नोकरीही दिली होती. केंद्र सरकारच्या संस्थेत नोकरी मिळत असल्याने अनेकांनी सध्याची चांगली नोकरी सोडलेली आहे.महेश व उमेश हे नोकरीला ठेवलेल्या तरुणांमार्फत विविध ठिकाणी धाड टाकायचे. तिथल्या कागदपत्रांची पडताळणी करून सेल्सटॅक्स भरला नाही, अथवा इतर कारणांवरून व्यावसायिकांना सक्तीने गाडीत बसवून चौकशीसाठी कार्यालयात घेऊन जायचे. अशाच एका प्रकाराची तक्रार हरिओम चौरासिया यांनी गुन्हे शाखा पोलिसांकडे केली होती. त्यानुसार उपआयुक्त तुषार दोशी यांनी युनिट दोनचे वरिष्ठ निरीक्षक एन. बी. कोल्हटकर यांच्याकडे तपास सोपवला होता. त्याकरिता सहायक निरीक्षक बी. एम. रायकर, बबन जगताप, हवालदार सुनील साळुंखे, अनिल पाटील, संजीव पगारे, सुनील कानगुडे, सूर्यकांत कुडावकर, प्रफुल्ल मोरे यांचे पथक तयार करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीच्या आधारे या पथकाने खांदेश्वर येथील क्राइम इंटेलिजन्स फोर्स व इंटेलिजन्स इनव्हेस्टिगेशन एजन्सी नावाच्या संस्थेच्या कार्यालयावर छापा टाकला. त्या ठिकाणावरून महेश मधुकर भडके (२५) व उमेश लक्ष्मण मोहिते (३२) यांना अटक करून त्यांची कार जप्त करण्यात आली आहे.गुन्हे शाखेच्या या कारवाईनंतर महेश व उमेश याच्या इशाºयावर काम करणाºया तरुणांना आपण बोगस संस्थेसाठी काम करत होतो, याची जाणीव झाल्याचे उपआयुक्त तुषार दोशी यांनी सांगितले. तसेच आनंद त्रिपाठी हा संस्थेचा प्रमुख असून, त्याचा शोध सुरू असल्याचेही दोशी यांनी सांगितले.बोगस संस्थांबरोबरच काही बोगस पत्रकारांनीही शहरात धुडगूस घातला आहे. बोगस डॉक्टर, व्यावसायिक हे पत्रकार असल्याची ओळखपत्रे दाखवून आपला धाक निर्माण करत आहेत. त्यांना बाजारभावानुसार ओळखपत्रे वाटणाºया संघटना शहरात सक्रिय झाल्या आहेत. त्यामध्ये गुप्तचर मीडिया, मीडिया इंटिलिजन्स अशा नावाच्या बोगस संघटनांसह सोयीनुसार निघणारी साप्ताहिके आघाडीवर आहेत. अशांवरही कारवाई होणे गरजेचे असताना, काही पोलीसच त्यांच्याशी जवळीक साधून असल्याचे दिसत आहे.बोगस संस्था चालवणारा महेश भडके हा काही वर्षांपूर्वी होमगार्डची नोकरी करायचा. गतवर्षी त्याने नवी मुंबई पोलीस भरतीतही नशीब आजमावले होते; परंतु परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यानंतर त्याने आनंद त्रिपाठीच्या सांगण्यानुसार बोगस संस्थेचे कार्यालय सुरू केले होते. दरम्यानच्या काळात काही दिवस तो पोलीस मित्र म्हणून काही ठिकाणी पोलिसांसोबत रात्रीच्या बंदोबस्तावरही असायचा.व्यावसायिकांवर छापा टाकताना प्रभाव पडावा, यासाठी ते स्वत:कडे खेळण्यातले पिस्तुल बाळगायचे. तर शासनाची मुद्रा असलेली ओळखपत्रे कामगार तरुणांना देण्यात आली होती. यानुसार फिल्मी स्टाइलने ते निश्चित ठिकाणी बनावट छापा टाकून मांडवलीच्या माध्यमातून लाखो रुपये उकळायचे.बनावट संघटनांकडून राज्य अथवा केंद्र सरकारच्या संघटनेशी मिळत्या-जुळत्या नावाचा वापर होत आहे, अशा संघटनेचा शासनाशी कसलाही संबंध नाही. त्यांच्याकडून व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकावले जात असल्यास स्थानिक पोलिसांकडे अथवा गुन्हे शाखेकडे तक्रार करावी.- तुषार दोशी, उपआयुक्त- गुन्हे शाखा

टॅग्स :Crimeगुन्हाNavi Mumbaiनवी मुंबई