शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

दक्षिण नवी मुंबईला मिळणार हेटवणे धरणातून अतिरिक्त पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 1:05 AM

सिडकोचा महत्त्वपूर्ण निर्णय : पाणी नियोजनासाठी समिती स्थापन

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई: दक्षिण नवी मुंबईतील सिडको वसाहती, उलवे, द्रोणागिरी आणि प्रस्तावित पुष्पकनगर आणि इतर प्रकल्पांच्या पाणीपुरवठ्याच्या नियोजनासाठी तज्ज्ञ समितीची नेमणूक करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. ही समिती पाणीपुरवठा आणि स्रोत याचा अभ्यास करून सिडकोला अहवाल सादर करेल, अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली आहे.

पनवेल पालिका, सिडको कार्यक्षेत्रातील काही नोड, गावांना हेटवणे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी हेटवणे धरणातून सिडकोला १५० एमएलडी पाणीसाठा उपलब्ध होत आहे. परंतु सध्याच्या स्थितीत हा पाणीसाठा अपुरा पडत आहे. त्यासाठी हेटवणे धरणातून १२० एमएलडी अतिरिक्त पाणीसाठ्याची तरतूद केली आहे. हा पाणीसाठा आरक्षित करण्यासाठी सिडकोने कोकण पाटबंधारे विकास महामंडळाला ११९.८० कोटी रुपये शुल्क अदा करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचे संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले. 

पनवेल आणि उरण तालुक्याचा समावेश असलेल्या दक्षिण नवी मुंबईची लोकसंख्या २० लाखांच्या घरात गेली आहे. या भागातील तळोजा, रोडपाली, कामोठे, कळंबोली, उलवे, द्रोणागिरीत सिडकोकडून मोठ्या प्रमाणात घरे बांधली जात आहेत. त्यामुळे भविष्यात येथे पाण्याची मागणी वाढणार आहे. प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, महागृहनिर्मित्ती, नैना क्षेत्र आदीमुळे २०५० पर्यंत या क्षेत्राची पाण्याची मागणी प्रतिदिनी १२७५ एमएलडी इतकी असेल, असा निष्कर्ष काढला जात आहे. पिण्याचे भविष्यकालीन नियोजन म्हणून हेटवणे धरणातून अतिरिक्त १२० एमएलडी पाणीसाठा आरक्षित करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील चार वर्षे या क्षेत्रातील प्रस्तावित प्रकल्पांना पाण्याची कमतरता भासणार नाही, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे. 

जलवाहिनी टाकण्याचे काम अंतिम टप्प्यातहेटवणे धरणातून सिडकोला कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. यातील तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी सिडकोने हेटवणेच्या जलवाहिन्या भूमिगत करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी हमरापूर येथील टेकडीच्या खालूून बोगदा खणला जात आहे. या बोगद्याची लांबी ७०० मीटर इतकी असून त्यातून १५०० मीमी व्यासाची जलवाहनी टाकण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. पुढील महिन्यात हे काम पूर्ण होणार असून त्यानंतर सिडकोला मिळणाऱ्या एकूण पाणीपुरवठ्यात ३० एमएलडी पाण्याची वाढ होणार आहे. 

टॅग्स :cidcoसिडको