शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 06:45 IST

अनंत पाटील  लोकमत न्यूज नेटवर्क  नवी मुंबई : महापालिका निवडणुकीत मतदारांना खूश करण्यासाठी प्रभागातील काही समाजसेवक, माजी नगरसेवकांसह इच्छुकांकडून ...

अनंत पाटील लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : महापालिका निवडणुकीत मतदारांना खूश करण्यासाठी प्रभागातील काही समाजसेवक, माजी नगरसेवकांसह इच्छुकांकडून थेट वातानुकूलीत रेल्वे, बस व विमानातून धार्मिक देवदर्शन, पिकनिक सहली, विविध वस्तूंच्या भेटी, वैद्यकीय आणि आरोग्य शिबिराच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे.  

काही गर्भश्रीमंत भावी उमेदवारांकडून मतदारांना विविध वस्तूंचे वाटप आणि एसटी, वातानुकूलित रेल्वे व खासगी बसमधून देवदर्शन, पर्यटन सुरू आहे. वारकऱ्यांना थेट विमानातून काशी विश्वेश्वराच्या आणि अयोध्येला श्री प्रभू रामाच्या दर्शनाचा लाभ मिळाला आहे. निवडणुका अनेक वर्षे लांबल्यामुळे  मतदारसंघात हवशे, नवशे आणि गवशे इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या भाऊगर्दीत विजय पक्का करण्याची चढाओढ लागली आहे. 

शिर्डी, महाबळेश्वर, गोवा अशा ठिकाणी पर्यटक खासगी बस भरून जात असल्याचे चित्र पाहावयास मिळते.  नवी मुंबईतील नवख्या उमेदवारांसह काही माजी नगरसेवकांचे शहापूर, अलिबाग, नागाव, नेरे, वाजे, खोपोली, पाली, माणगाव, जाम्बुर्डे, कर्जत, मुरुड, जंजिरा, म्हाडस, मुरबाड, बदलापूर परिसरात फार्म हाऊस आहेत. या फार्म हाऊसवर  खासगी बसमधून मतदारांचे  पर्यटन घडविण्यात येत आहे. पर्यटन करणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा सर्वाधिक भरणा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Election Bribes: Pilgrimages, Parties, Gifts Offered to Navi Mumbai Voters

Web Summary : Navi Mumbai election hopefuls are enticing voters with religious trips, picnics, gifts, and medical camps. Wealthy candidates offer tours to destinations like Kashi and farmhouses, particularly targeting senior citizens, amidst increased competition due to delayed elections.
टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporation Electionनवी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६