शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

"...तर मंत्रिपद काय चाटायचं आहे का?", गणेश नाईकांचा पुन्हा एकनाथ शिंदेंवर हल्ला; भूखंड बिल्डरांना दिल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 12:04 IST

भूखंडाच्या वाटपावरून भाजपाचे कॅबिनेट मंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत. 

महापालिका निवडणुकीत भाजपाचे गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला होता. काही काळ गेल्यानंतर गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केले. "मी ज्या मंत्रिमंडळात आहे, त्या मंत्रिमंडळातील नगरविकास खात्याच्या लोकांनी असे कर्म दरिद्री काम केले आहे", असे म्हणत गणेश नाईक यांनी नगरविकासाने भूखंड बिल्डरांच्या घशात घातल्याचा आरोप केला. 

नवी मुंबईतील वाशी येथे गणेश नाईक यांनी जनता दरबार आयोजित केला होता. यावेळी नाईक यांनी सिडको आणि महापालिका अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला. 

गणेश नाईकांनी शिंदेंवर टीका का केली?

गणेश नाईक म्हणाले, "नवी मुंबईकरांच्या सुविधेसाठी भूखंड मागितले होते. ते भूखंड बिल्डरांच्या घशात घातले जात आहेत. नगरविकास खात्यातील लोकांनी हे कर्म दरिद्री काम केले आहे."

"रुग्णालया करिता. बागे करिता. एखाद्या शाळे करिता, भूखंड मागितले, पण ते दिले गेले नाही. काही दलालांनी ते बिल्डरांच्या घशात घातले", असा आरोप गणेश नाईक यांनी केला. 

'मला या गोष्टीची लाज वाटते'

"मला या गोष्टीची लाज वाटते की, ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे, त्या मंत्रिमंडळातील नगर विकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचे काम केले आहे. मी मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे. तुमची इच्छा असेल, तर सिडकोकडून, एमआयडीसीकडून विकासाकरिता, जनतेच्या हिताकरिता भूखंड आहे, ते देण्याची व्यवस्था करा", असे नाईक म्हणाले. 

"मी पक्षाच्या शिस्तीचा आणि प्रशासनाच्या शिस्तीचा आहे. पण, ज्या गोष्टीसाठी गणेश नाईक आमदार झाला. मंत्री झाला. तेच जर मी जनतेसाठी बोलू शकलो नाही, मी जर मिळवू शकलो नाही, तर ते मंत्रिपद काय चाटायचे आहे का? मंत्रिपद पक्षाने दिले, मी पक्षाचा आभारी आहे. पण, याचा अर्थ मुका होऊन बसण्यासाठी ते मंत्रिपद मी स्वीकारलेलं नाही", असे गणेश नाईक एकनाथ शिंदेंवर टीका करताना म्हणाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Ganesh Naik attacks Eknath Shinde, alleges land given to builders.

Web Summary : Ganesh Naik criticized Eknath Shinde, alleging that land intended for public amenities was given to builders by the Urban Development Department. He questioned the value of his ministerial position if he couldn't advocate for the people's needs and vowed to raise the issue with the Chief Minister.
टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकEknath Shindeएकनाथ शिंदेNavi Mumbaiनवी मुंबईPoliticsराजकारणBJPभाजपाShiv Senaशिवसेना