कळंबोलीत चिमुरडीला कारने चिरडले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 23:29 IST2019-11-06T23:29:16+5:302019-11-06T23:29:28+5:30

घटना होवून दोन दिवसाचा काळावधी लोटला तरी देखील अद्याप कळंबोली पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे

small girl was hit by a car in Kalamboli | कळंबोलीत चिमुरडीला कारने चिरडले 

कळंबोलीत चिमुरडीला कारने चिरडले 

पनवेल : कळंबोली मधील साई नगर सेक्टर 4 मध्ये साक्षी सिंग (9) या चिमुरडीला  मंगळवारी भरधाव कारने चिरडल्याची घटना मंगळवारी दुपारी 3.30 वाजता घडली .या घटनेत गंभीर जखमी झाली असुन तिच्यावर कामोठे एमजीएम येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

घटना होवून दोन दिवसाचा काळावधी लोटला तरी देखील अद्याप कळंबोली पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.अशीच घटना काही महिन्यापूर्वी कामोठे वसाहतीत घडली होती.

Web Title: small girl was hit by a car in Kalamboli