शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कौशल्य विकास केंद्र लवकरच

By admin | Updated: July 17, 2015 02:47 IST

शहरातील बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी देणारे कौशल्य केंद्र उभारण्याची मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी नरिमन पॉइंटच्या निर्मल भवन येथे झालेल्या बैठकीत केली.

नवी मुंबई : शहरातील बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी देणारे कौशल्य केंद्र उभारण्याची मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी नरिमन पॉइंटच्या निर्मल भवन येथे झालेल्या बैठकीत केली. या बैठकीत सिडकोचे संचालक संजय भाटिया आणि कौशल्य विकास(स्किल डेव्हलपमेंट) योजनेचे सचिव विजय गौतम यांच्यासोबत झालेल्या चर्चेतून लवकरच नवी मुंबईत कौशल्य विकास केंद्र उभारण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयास हिरवा कंदील मिळाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच नवी मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्किल डेव्हलपमेंट योजनेला सुरुवात करण्यात येणार आहे.कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून लाखो भारतीय युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध होण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्याच्या प्रगतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात प्रमोद महाजन कौशल्य योजना सुरू केली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नवी मुंबईसारख्या सायबर सिटीत स्थापन करण्यात येणाऱ्या कौशल्य विकास केंद्रासाठी संजय भाटिया यांनी ५ एकरचा भूखंड देण्याचे कबूल केले. तर विजय गौतम यांनी नवी मुंबई परिसरातील वेगवेगळ््या कंपन्यांना सहभागी करून त्यांच्यामार्फत विविध कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यासाठी विशेष सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. यामाध्यमातून नवी मुंबई शहरातील हजारो युवकांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे मंदा म्हात्रे यांनी स्पष्ट केले.