इरशाळगडावर रस्ता भरकटलेल्या सहा ट्रेकर्सची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 20:43 IST2019-01-12T20:43:38+5:302019-01-12T20:43:43+5:30
पनवेल नजीकच्या चौक जवळील इरशाळगडावर रस्ता भरकटलेल्या सहा ट्रेकर्सची पनवेल मधील निसर्गमित्र संस्थेच्या ट्रेकर्सनी शनिवारी सायंकाळी उशिरा सुटका केली.

इरशाळगडावर रस्ता भरकटलेल्या सहा ट्रेकर्सची सुटका
पनवेल - पनवेल नजीकच्या चौक जवळील इरशाळगडावर रस्ता भरकटलेल्या सहा ट्रेकर्सची पनवेल मधील निसर्गमित्र संस्थेच्या ट्रेकर्सनी शनिवारी सायंकाळी उशिरा सुटका केली. पुण्यावरून गणेश उबाळे सह पाच जणांचा ग्रुप या गडावर ट्रेकिंगसाठी आले होते . मात्र गडावरील रस्ता चुकल्याने सहा जण गडावर अडकले .
दरम्यान या घटनेची माहिती या ट्रेकर्सनी पुणे स्थित एमएमआरसीए या ट्रेकर्सची मदत करणा-या संस्थेला दिली . यावेळी या संस्थेने पनवेल मधील निसर्गमित्र संस्थेला दिल्यानंतर निसर्गमित्र संस्थेचे सचिन शिंदे यांनी दूरध्वनीद्वारे या ट्रेकर्सशी संपर्क साधला . त्यानंतर मोबाईल लोकेशनच्या मदतीने या ट्रेकर्सना गाठत त्यांची सुटका केली . या बचाव कार्यात निसर्गमित्र संस्थेचे विश्वेश महाजन व वराड पवार चा समावेश होता . रस्ता भरकटलेल्या सहा जणांमध्ये दोन मुली व चार मुलांचा समावेश होता .