नवी मुंबईत होणार आणखी सहा सायकल ट्रॅक
By नारायण जाधव | Updated: March 6, 2024 16:57 IST2024-03-06T16:57:07+5:302024-03-06T16:57:24+5:30
या कामांवर महापालिका १६ कोटींहून अधिक रक्कम खर्च करणार आहे.

नवी मुंबईत होणार आणखी सहा सायकल ट्रॅक
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेचा वाशी आणि नेरूळपाठोपाठ शहरातील इतर नोडमध्येही सायकल ट्रॅकचे नियोजन केले आहे. या कामांवर महापालिका १६ कोटींहून अधिक रक्कम खर्च करणार आहे.
नव्या सायकल ट्रॅकमध्ये घणसोली-ऐरोली रस्त्याच्या कडेला आठ किमी, ऐरोलीत डीएव्ही शाळा ते सेक्टर १४, १५ येथे ३.२ किमी, ठाण्याच्या वेशीवर इच्छापूर्ती गणेश मंदिर ते पटनी कंपनीपर्यंत सहा किमी, नेरूळला ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई, पामबीच मार्गावरील सेवारस्त्यालगत नऊ किमी आणि बेलापूरच्या डोंगरालगतच्या रमाबाईनगरापासून ते खारघर रेन-ट्री हिलपर्यंतच्या सायकल ट्रॅकचा समावेश आहे.
महापालिकेने शहरवासीयांना पर्यावरणपूरक प्रवास करता यावा, यासाठी युलू कंपनीच्या मदतीने इलेक्ट्रिक सायकल आणि बॅटरीवरील दुचाकी भाडेतत्त्वावर देण्याची सुविधा ९२ ठिकाणी उपलब्ध केलेली आहे. या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तिच्याने मार्च २०२३ ते जानेवारी २०२४ या काळात १ लाख १८ हजार २३४ नागरिकांनी ११ लाख ५२ हजार २३० किमी प्रवास केला असून महापालिकेस ११ कोटींहून कार्बन क्रेडिट मिळाले आहे.