शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर स्मारकासाठी मूक निदर्शने

By admin | Updated: January 28, 2017 03:05 IST

ऐरोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाविषयी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या भूमिकेविरोधात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी

नवी मुंबई : ऐरोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाविषयी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेल्या भूमिकेविरोधात सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी वाशीमध्ये मूक निदर्शने केली. मार्बलला विरोध करून स्मारकाचे काम जाणीवपूर्वक रखडविण्यात आले आहे. नागरिकांमध्ये असंतोष असून आता मूक निदर्शने केली असली तरी भविष्यात राज्यभर आंदोलन उभे करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. वाशीतील शिवाजी चौकामध्ये सर्वपक्षीय नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून व हातामध्ये निषेधाचे फलक घेवून नवी मुंबईमध्ये लोकशाहीची गळचेपी सुरू असल्याचे शहरवासीयांच्या निदर्शनास आणून दिले. सभागृहाच्या आदेशाचे पालन केले जात नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक रखडविले जात असून त्यांनी लिहिलेल्या घटनेने दिलेल्या अधिकारांचीही पायमल्ली होत असल्याबद्दल आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली. आंबेडकर स्मारकाविषयी उग्र आंदोलनाची मागणी नागरिकांकडून होत आहे. पदाधिकाऱ्यांच्या भावनाही तीव्र आहेत. तरीही सर्वप्रथम आयुक्तांना विनंती केली. सर्वसाधारण सभेमध्ये लक्षवेधी मांडण्यात आली. पण यानंतरही काहीच कार्यवाही झाली नाही. आतातरी प्रशासनाने हट्ट सोडावा अन्यथा आंबेडकरी जनतेचा संयम सुटेल व त्यानंतर उग्र निदर्शनाला पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. मोर्चात राष्ट्रवादी काँगे्रसचे नवी मुंबई अध्यक्ष अनंत सुतार, शिवराम पाटील, सुरेश कुलकर्णी, संजू वाडे, अंकुश सोनावणे, सिद्राम ओहोळ, शुभांगी पाटील, रंजना सोनावणे व इतर उपस्थित होते. (प्रतिनिधी)