कारवाईमुळे पादचारी मार्ग बंद
By Admin | Updated: March 21, 2017 02:12 IST2017-03-21T02:12:34+5:302017-03-21T02:12:34+5:30
महापालिकेने नेरूळ सेक्टर २० मधील अनधिकृत इमारतीवर अर्धवट कारवाई करून डेब्रिज पायऱ्यांवर टाकले आहे.

कारवाईमुळे पादचारी मार्ग बंद
नवी मुंबई : महापालिकेने नेरूळ सेक्टर २० मधील अनधिकृत इमारतीवर अर्धवट कारवाई करून डेब्रिज पायऱ्यांवर टाकले आहे. यामुळे बालाजी मंदिराकडे जाणारा पादचारी मार्ग बंद झाला असून नागरिकांनी नाराजी व्यक्त होत आहे.
सिडको व महापालिकेने शहरातील अनधिकृत इमारतींवर कारवाई सुरू केली आहे. पण एकही कारवाई पूर्ण केली जात नाही. इमारतीचा काही भाग पाडून उर्वरित इमारत आहे तशीच ठेवली जात आहे. नेरूळमध्ये बालाजी मंदिराच्या पायथ्याशी असलेली इमारतही महिन्यापूर्वी पाडली आहे. इमारत पाडल्यानंतर डेब्रिज तिथेच रोडवर व पायऱ्यांवर ठेवण्यात आले आहे. या परिसरातील नागरिक रेल्वे स्टेशनकडे जाण्यासाठी पायरी मार्गाचा वापर करतात. पण पालिकेने केलेल्या कारवाईपासूनरस्ताच बंद झाला आहे. कारवाई करणाऱ्या पथकाने नागरिकांच्या गैरसोयीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.
महापालिकेने अर्धवट अवस्थेत ठेवलेली इमारत पावसाळ्यात कोसळून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पायऱ्यांकडे जाणारा रस्ता बंद असल्याने नागरिकांना तारेचे कुंपण ओलांडून जावे लागत आहे. (प्रतिनिधी)