खरेदीसाठी बाजारात झुंबड
By Admin | Updated: September 15, 2015 23:37 IST2015-09-15T23:37:23+5:302015-09-15T23:37:23+5:30
बाप्पाचे आगमन अवघ्या काही तासांवर आले आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, घराघरातील भक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे. अंतिम टप्पातील छोट्या

खरेदीसाठी बाजारात झुंबड
कळंबोली : बाप्पाचे आगमन अवघ्या काही तासांवर आले आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, घराघरातील भक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे. अंतिम टप्पातील छोट्या - मोठ्या खरेदीसाठी बाजारात झुंबड उडाली आहे.
सार्वजनिक मंडळांचीही लगबग वाढली असून, परवानगी, दहा दिवसांत विविध कार्यक्र मांचे नियोजन, मंडप उभारणी आदी कामांना वेग आला आहे, तर कारागिरांच्या आरास बनविण्याच्या कामांनाही वेग आला आहे. सार्वजनिक मंडळांसह घरोघरी गणपतीसमोर आरास बनविली जाते. त्यासाठी लागणाऱ्या वस्तू बाजारपेठेतून खरेदी केल्या जात आहेत. तर अनेक जण वेळेअभावी शोभेच्या वस्तूंना प्राधान्य देतात. ग्राहकांची आवड लक्षात घेत व्यावसायिकांकडून अगदी ५0 रुपयांपासून ते १0 हजारांपर्यंत शोभेच्या वस्तू बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मुंबई-पुणे महामार्गावर भिंगारी गावाजवळ विविध शोभेच्या वस्तू विक्र ीकरिता ठेवण्यात आल्या आहेत. पनवेल बाजारपेठेत गणेशोत्सवात घरगुती सजावटीसाठी लागणारी रूपेरी वर्क असलेली कागदाची झुंबरे, रंगीबेरंगी कागदाच्या माळा, मोत्यांचे हार, फुले, आदी वस्तूंनी बाजारपेठ सज्ज झाली आहे.