सराईत गुन्हेगाराची तिसऱ्यांदा हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 12:00 AM2018-10-18T00:00:49+5:302018-10-18T00:01:02+5:30

पत्नी, सासू ताब्यात : नवी मुंबई पोलिसांचे वसईत थरारनाट्य

Shouting criminal third time deflation | सराईत गुन्हेगाराची तिसऱ्यांदा हुलकावणी

सराईत गुन्हेगाराची तिसऱ्यांदा हुलकावणी

Next

नवी मुंबई : अनेक वर्षांपासून पोलीस मागावर असलेला सराईत गुन्हेगार तिसºयांदा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. त्याच्यावर राज्याच्या विविध भागांत ८१ गुन्हे दाखल असून, त्यापैकी ५८ गुन्हे नवी मुंबईतले आहेत. यापूर्वी खेड व गुजरात येथे त्याने पोलिसांना चकमा दिल्यानंतर रविवारी रात्री पुन्हा वसई येथे पोलिसांनी त्याला घेरले असता, गोळीबार करून तो निसटला.


फय्याज शेख असे पोलिसांना हव्या असलेल्या आरोपीचे नाव आहे. मागील अनेक महिन्यांपासून नवी मुंबईसह राज्याच्या विविध भागांतील पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सोनसाखळी चोरीसह लुटीचे ८१ गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. मात्र, राहण्याची ठिकाणे सतत बदलत असल्याने तो आजवर पोलिसांच्या हाती लागला नाही. यापूर्वी खेड व गुजरात येथे त्याला पकडण्याचा प्रयत्न झाला असता, तो चकमा देण्यात यशस्वी झाला होता. मात्र, काही दिवसांपूर्वी खारघरमधील एका सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात त्याचा सहभाग दिसून आला होता. त्यामध्ये फय्याज दुचाकी चालवत होता, तर त्याच्या मागे बसलेल्या बुरखाधारी महिलेने सोनसाखळी चोरली होती. यावरून तो पुन्हा नवी मुंबईत सक्रिय होत असल्याचे दिसून येत होते.


आयुक्त संजय कुमार, सहआयुक्त सुरेशकुमार मेकला, गुन्हे शाखा उपआयुक्त तुषार दोशी, सहायक आयुक्त अजय कदम यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ निरीक्षक जगदीश कुलकर्णी, संदीपान शिंदे, अजयकुमार लांडगे, शिरीष पवार व बाळासाहेब कोल्हटकर यांचे पथक तयार करण्यात आले होते. या दरम्यान फय्याज हा वसई परिसरात असल्याची माहिती मिळताच रविवारी रात्री हे पथक त्या ठिकाणी रवाना झाले. या वेळी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी खानिवली टोलनाक्यावर फय्याजची गाडी अडवली; परंतु पोलिसांनी घेरल्याचे समजताच त्याने कार उलटी पळवत एका कंटेनरसह तीन ते चार वाहनांना धडक देत पळून जाण्याचा प्रयत्न केला.


या वेळी कारमध्ये त्याची पत्नी व सासू देखील होत्या; परंतु पळण्याचा मार्ग बंद झाल्याचे समजताच त्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला असता, पोलिसांनीही त्याच्या कारच्या टायरवर गोळ्या झाडल्या. त्यानंतरही टायर फुटलेल्या अवस्थेत त्याने कार पळवून काही अंतरावर सोडून अंधारात पळ काढला. या वेळी त्याची पत्नी व सासू पोलिसांच्या हाती लागल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Web Title: Shouting criminal third time deflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.