धक्कादायक! लग्नात चेन न केल्याने विवाहितेला हाकलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 23:09 IST2018-12-03T23:08:52+5:302018-12-03T23:09:00+5:30

लग्नात सोन्याची चेन न केल्याच्या कारणावरून सासरच्यांनी विवाहितेला घराबाहेर हाकलल्याचा प्रकार घडला आहे.

Shocking Due to not having a chain on wedding, he got married | धक्कादायक! लग्नात चेन न केल्याने विवाहितेला हाकलले

धक्कादायक! लग्नात चेन न केल्याने विवाहितेला हाकलले

नवी मुंबई : लग्नात सोन्याची चेन न केल्याच्या कारणावरून सासरच्यांनी विवाहितेला घराबाहेर हाकलल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सासरच्यांविरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जासई येथील माहेर असलेल्या महिलेसोबत हा प्रकार घडला आहे. पाच महिन्यांपूर्वी त्यांचा नेरुळच्या व्यक्ती यांच्यासोबत विवाह झालेला. परंतु विवाहानंतर काही दिवसातच त्यांच्याकडून हुंड्यासाठी छळ सुरू होता असे तक्रारदार महिलेचे म्हणणे आहे. लग्नात सोन्याची चेन का केली नाही या कारणावरून सासरच्यांकडून त्यांचा मानसिक, तसेच शारीरिक छळ सुरू होता. यावरून सातत्याने होणाऱ्या भांडणातून सदर महिलेला सासरच्यांनी घराबाहेर हाकलून दिले. त्यानुसार पीडित महिलेने नेरुळ पोलीस ठाण्यात सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास करत आहेत.

Web Title: Shocking Due to not having a chain on wedding, he got married