शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरणचा ग्राहकांना झटका

By admin | Updated: July 3, 2017 06:43 IST

वीज वितरण कंपनीकडून शहरातील ग्राहकांना बिलाच्या माध्यमातून झटका बसत आहे. २०० ते ५०० रुपयांपर्यंत साधारण महिना

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : वीज वितरण कंपनीकडून शहरातील ग्राहकांना बिलाच्या माध्यमातून झटका बसत आहे. २०० ते ५०० रुपयांपर्यंत साधारण महिना बिल असणाऱ्या ग्राहकांना तीन हजार ते चार हजार रुपयांपर्यंतचे बिल येऊ लागले आहे. यामुळे वीज वितरणविषयी नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण होऊ लागली आहे.वीज वितरणच्या ढिसाळ कारभाराचे शहरात सर्वच विभागांमध्ये दर्शन घडत आहे. उघड्या विद्युत डीपी, उघड्यावर पडलेल्या भूमिगत विद्युत वायरी यामुळे अनेकांचे प्राण जात आहेत. यासंबंधीच्या अनेकदा तक्रारी करूनही वीज वितरणकडून त्यात सुधार झाल्याचे दिसत नाही. यामुळे वितरणच्या कामचुकार पद्धतीवर नागरिकांची नाराजी असतानाच ग्राहकांना बिलाच्या माध्यमातून झटका बसू लागला आहे. उन्हाळ्याचा संपूर्ण कालावधी विजेच्या लपंडावामध्ये गेल्यानंतरही ग्राहकांना बिल मात्र दुप्पट येऊ लागले आहे. यासंदर्भात काहींनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधून चौकशीही केली; परंतु काहींना उडवाउडवीची उत्तरे मिळाली, तर काहींना रीडिंग दरम्यान नोंद झालेल्या जादा युनिटनुसार बिलाची आकारणी झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, रीडिंग घेणारे कंत्राटदार व वीज वितरण अधिकारी यांच्या संगनमताने ग्राहकांची लूट होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. रीडिंग घेण्याची ठरावीक मुदत नसल्याचा भुर्दंड ग्राहकांना बसत आहे. प्रत्येक महिन्याच्या ठरावीक तारखेलाच रीडिंग घेतल्यास, त्या कालावधीत झालेल्या नेमक्या युनिटचा वापर नोंदीवर येऊ शकतो. प्रत्यक्षात मात्र वितरणकडून तसे होताना दिसत नाही. यामुळे शहरातील शेकडो वीज ग्राहकांना मागील दोन महिन्यांत दुपटीने बिल प्राप्त झाले आहे. अशाच प्रकाराने घणसोलीतील काही ग्राहक वीजबिलाच्या रकमेनेच होरपळले आहेत. महिना उलटून गेल्यानंतर काहीशा उशिराने ग्राहकांच्या मीटरची रीडिंग घेतली जात असल्याचा आरोप घणसोलीतील रहिवासी भरत चव्हाण व अर्जुन कोडीतकर यांनी केला आहे. तर जादा युनिट मोजले गेल्याने युनिट वापराचा एक टप्पा ओलांडल्याच्या कारणावरून वाढीव बिल दिले जाते.