महापालिकेच्या सभागृहास शकुंतला महाजन यांचे नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 11:47 PM2019-07-25T23:47:38+5:302019-07-25T23:47:50+5:30

स्मृती जपण्याचा प्रयत्न : नामकरणानिमित्त आठवणींना उजाळा

Shakuntala Mahajan's name in the Municipal House | महापालिकेच्या सभागृहास शकुंतला महाजन यांचे नाव

महापालिकेच्या सभागृहास शकुंतला महाजन यांचे नाव

googlenewsNext

नवी मुंबई : सीबीडी-बेलापूरमधील बहुउद्देशीय इमारतीला कवयित्री व माजी नगरसेविका शकुंतला महाजन यांचे नाव देण्यात आले आहे. शहराच्या विकासामध्ये महाजन यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण पुढील पिढीला व्हावे, यासाठी हे नाव देण्यात आले आहे.

महिलांच्या विकासाची तळमळ घेऊन काम करणाऱ्या शकुंतला महाजन यांच्या सेवाभावी कार्याचे स्मरण कायम ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे महापौर जयवंत सुतार यांनी या वेळी स्पष्ट केले. महाजन यांनी महिला व बालकल्याण समितीच्या अध्यक्ष असताना केलेल्या कामाची माहितीही त्यांनी दिली. आमदार मंदा म्हात्रे यांनी शकुंतला महाजन यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला. सामान्यातल्या सामान्य माणसाचा विचार करून सेवाभावी काम करणाºया त्या प्रामाणिक सामाजिक कार्यकर्त्या होत्या, असे मतही व्यक्त केले.

या वेळी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, नगरसेवक अशोक गुरखे, स्थानिक नगरसेविका सुरेखा नरबागे, डॉ. जयाजी नाथ, अनिता मानवतकर, माजी नगरसेवक निवृत्ती कापडणे, कार्यकारी अभियंता शंकर पवार, विभाग अधिकारी शशिकांत तांडेल, उपअभियंता पंढरीनाथ चौडे, भीमराव महाजन व इतर उपस्थित होते. महाजन यांच्या कन्या व महानगरपालिकेच्या सानपाडा माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा कुदळे यांनी मनमोगरा या महाजन यांच्या काव्यसंग्रहातील कविता सादर केली.

Web Title: Shakuntala Mahajan's name in the Municipal House

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.