शॅगी पुन्हा पोलीस कोठडीत
By Admin | Updated: May 27, 2017 02:52 IST2017-05-27T02:52:34+5:302017-05-27T02:52:34+5:30
कॉल सेंटर प्रकरणातून अमेरिकन नागरिकांकडून करोडो रुपयांची खंडणी उकळणाऱ्या सागर ऊर्फ शॅगी ठक्कर याचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने पुन्हा ताबा घेतला आहे

शॅगी पुन्हा पोलीस कोठडीत
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कॉल सेंटर प्रकरणातून अमेरिकन नागरिकांकडून करोडो रुपयांची खंडणी उकळणाऱ्या सागर ऊर्फ शॅगी ठक्कर याचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने पुन्हा ताबा घेतला आहे. त्याला पोलिसांच्या मागणीनंतर ठाणे न्यायालयाने पुन्हा नयानगर येथील प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
शॅगीसह त्याच्या साथीदारांनी ठाणे जिल्ह्यातील काशिमीरा येथील ‘डेल्टा’ इमारतीमधील कॉल सेंटरमधून १४ कोटींची, तर नयानगर येथील एमबाले हाउसमधील हैदरअली याच्या कॉल सेंटरमधून १९ कोटींची फसवणूक झाल्याचे तपासात उघड झाले आहे. किमान ५०० पेक्षा अधिक अमेरिकन नागरिकांची करोडो रुपयांची फसवणूक झाली आहे. आतापर्यंत केवळ १२ अमेरिकन नागरिकांचे आवाज आणि ओळख पडताळली आहे. शॅगीविरुद्ध नयानगर पोलीस ठाण्यातही कॉल सेंटर प्रकरणाचा आणखी एक गुन्हा दाखल आहे. याच चौकशीसाठी त्याला पुन्हा पोलीस कोठडी देण्याची मागणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौडकर यांनी ठाणे न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार, त्याला गुरुवारी न्यायालयातून ताब्यात घेण्यात आले. त्याने दुबईत ‘फिनिक्स आयटी इन्फ्रास्ट्रक्चर’ ही कंपनीही सुरू केली होती. या सर्वच बाबींचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दुबईव्यतिरिक्त थायलंड येथेही तो १० दिवसांसाठी गेला होता. तिथून पुन्हा तो दुबईत आला.
ला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, सहायक पोलीस निरीक्षक अविनाश कुऱ्हाडे यांच्या पथकाने ८ एप्रिल २०१७ रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली होती. त्याला सुरुवातीला १२ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. या कोठडीदरम्यान त्याने बरीच महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर, त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली होती. त्याच्या