वाडा : कुडूस येथील विशाल भारती (वय ८) या अल्पवयीन मुलावर आरोपीने अमानुष लैंगिक अत्याचार केल्याचे शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाले असल्याची माहिती डॉ. प्रदीप जाधव यांनी दिली. कुडूस येथील लक्ष्मीनगर परिसरात परप्रांतीय वस्ती आहे. या वस्तीत रामराज भारती कुंटुबासह राहतो. त्याचा दुसरीत शिकणारा मुलगा विशाल याला मंगळवारी सायंकाळी आरोपी अजय बन्सल याने चॉकलेटचे आमिष दाखवून लक्ष्मीनगरच्या मागील बाजूस असलेल्या झाडाझुडपात नेले. नशेमध्ये असलेल्या आरोपीने विशालवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर ही घटना कुणाला सांगू नये म्हणून त्याने मुलाचा गळा दाबून व दगडाने ठेचून खून केला. त्याला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला २४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (वार्ताहर)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}