भावाकडून बहिणीवर लैंगिक अत्याचार
By Admin | Updated: March 20, 2017 02:18 IST2017-03-20T02:18:02+5:302017-03-20T02:18:02+5:30
लहान भावाने मोठ्या बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना कोपरखैरणेत घडली आहे. आॅक्टोबर २०१६ मध्ये घडलेल्या या प्रकारानंतर बहीण गरोदर राहिल्याने

भावाकडून बहिणीवर लैंगिक अत्याचार
नवी मुंबई : लहान भावाने मोठ्या बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना कोपरखैरणेत घडली आहे. आॅक्टोबर २०१६ मध्ये घडलेल्या या प्रकारानंतर बहीण गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. दोघेही अल्पवयीन असून याप्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आईच्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरखैरणे परिसरात राहणारे हे कुटुंब असून पीडित मुलीचे वडील रिक्षाचालक आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्या १७ वर्षीय मुलीच्या पोटात दुखत होते. तपासणीसाठी नेले असता, ती पाच महिन्यांची गरोदर असल्याचे उघड झाले. याबाबत आईने तिच्याकडे चौकशी केली असता, आॅक्टोबर २०१६ मध्ये लहान भावाने लैंगिक अत्याचार केल्याची माहिती तिने आईला दिली. कामानिमित्ताने आई-वडील घराबाहेर गेले असता, १४ वर्षीय लहान भावाने तिच्यासोबत हे कृत्य केले होते. भावाकडून झालेल्या लैंगिक अत्याचारातून गरोदर राहिल्यामुळे हा प्रकार उघड झाला. अखेर तिने घडलेल्या संपूर्ण प्रकाराची माहिती घरच्यांना दिल्यानंतर आईच्या तक्रारीवरून पीडित मुलीच्या अल्पवयीन भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)