शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीचा सात गावांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2019 00:59 IST

तळोजा परिसरातील काही गावे पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतात.

कळंबोली : तळोजा परिसरातील काही गावे पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतात. मात्र, या ठिकाणी जाणे अनेकांसाठी गैरसोयीचे ठरत आहे. ही गावे जवळच्या पोलीस ठाण्याला जोडण्यात यावीत, असा प्रस्ताव पनवेल तालुका भाजपने राज्य शासनाला दिला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री कार्यालयाने हा प्रस्ताव गृहसचिवांकडे पाठवला आहे.पनवेल तालुका पोलीस ठाणे यांचे कार्यक्षेत्र खूप मोठे आहे. शहरी भागाबरोबरच पनवेल तालुक्यातील अनेक गावे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतात. २००७ पर्यंत ग्रामीण हद्द रायगड पोलिसांकडे होती. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या नियंत्रणाखाली हा परिसर होता; परंतु त्यानंतर हा भाग नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या अधिकाराखाली जोडण्यात आला. २०१३ मध्ये खांदेश्वर, कामोठे हे दोन नवीन पोलीस ठाणे झाले. त्यामुळे पूर्वीच्या पनवेल शहर आणि कळंबोली पोलीस स्टेशनची हद्द विभागली गेली; परंतु पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे क्षेत्र आहे इतकेच राहिले. खालापूर, पेण आणि ठाणे हद्दीपर्यंत या पोलिसांची सीमा आहे. १०० पेक्षा जास्त गावांतील कायदा आणि सुव्यवस्था त्यांना पाहवी लागते. त्यामुळे पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर ताण येतो. तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठीसुद्धा गैरसोयीचे आहे. पोलीस ठाण्यात जाण्याकरिता किमान १५ कि.मी. अंतर पार करावे लागते. मोठ्या प्रमाणात वेळ, पैसा वाया जातो. एखादी तक्रार करायची तर थेट तालुका पोलीस ठाण्यात जावे लागते. तसेच गावात काही भांडण-तंटा झाला, चोरी-दरोड्याचे गुन्हे घडले तर तालुका पोलिसांना वेळेत येथे पोहोचता येत नाही. बीट अधिकारी किंवा हवालदार नियुक्त केले असले तरी त्यांना अनेक मर्यादा येतात. यामुळे खाकीचा धाक गुन्हेगार, अवैध धंदा करणाऱ्यांवर राहत नसतो.पासपोर्टसह इतर कामांकरिता तालुका पोलीस स्टेशनला जावे लागते. बाजूला तळोजा पोलीस स्टेशन असले तरी नागरिकांना पनवेलला जावे लागत असल्याने त्रास होतो. यासंदर्भात भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी आणि कळंबोली शहर उपाध्यक्ष प्रशांत रणवरे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनानुसार शासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू केला. मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव अजोय मेहता यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन हा प्रस्ताव गृहविभागाचे सचिव संजयकुमार यांच्याकडे पाठवला आहे. त्याचबरोबर रणवरे यांनी परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे, सहायक आयुक्त रवींद्र गिड्डे यांच्यासह स्थानिक पोलीस स्टेशनना पत्र दिले आहे.>या गावांची होते गैरसोयकोलवाडी, वलप, पाले बुद्रुक, हेदुटणे, चिंध्रण, वावंजे, खैरणे ही गावे तळोजा पोलिसांत आहेत. मात्र, त्यांची हद्द पनवेल तालुका पोलीस ठाण्यात येते. बाजूलाच पोलीस स्टेशन असताना त्यांना थेट १५ कि.मी. दूर जावे लागते.>पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीमधील काही गावे अंतराने लांब आहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्यानुसार याबाबत वरिष्ठ पातळीवर आम्ही कळवले आहे. ही गावे तळोजा पोलीस स्टेशनला जोडण्यात यावीत, ही मागणी आमच्याकडे आली आहे. त्यानुसार वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल.- रवींद्र गिड्डे,सहायक पोलीस आयुक्त, पनवेल विभाग