शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणी अभय कुरुंदकरला सात दिवसांची पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 15:48 IST

महिला पोलीस अधिकारी अश्विनी राजू गोरे-बिद्रे बेपत्ता प्रकरणी अटक करण्यात आलेल्या ठाणे सुरक्षा शाखेमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरूंदकरला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

नवी मुंबई - महिला पोलीस अधिकारी अश्विनी राजू गोरे-बिद्रे बेपत्ता प्रकरणी अटक करण्यात आलेल्या ठाणे सुरक्षा शाखेमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरूंदकरला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणी गुरुवारी अभय कुरुंदकरला अटक करण्यात आली. पनवेल पोलिसांनी ठाण्यातून अभय कुरुंदकरला अटक केली होती. आज न्यायालयात हजर केलं असता त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. गेल्या दीड वर्षापासून अश्विनी बिद्रे कळंबोलीतून बेपत्ता आहेत.

अश्विनी बिद्रे यांचे वडिल जयकुमार बिद्रे यांनी उच्च न्यायालयाने आदेश देऊनही तपास करण्यात पोलीस टाळाटाळ करीत असल्याची तक्रार केली होती. अभय श्यामसुंदर कुरुंदकर यांनी घातपात केला असावा, असा संशयही त्यांनी व्यक्त केला होता. अखेर पोलिसांनी कारवाई करत अभय कुरुंदकरला अटक केली. पण पोलिसांना कारवाईसाठी दीड वर्ष का लागली असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे - गोरे बेपत्ता प्रकरण गेल्या दीड वर्षापासून राज्यभर गाजत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आळते गावातील अश्विनीचा २००५ मध्ये हातकणंगलेमधील राजू गोरे याच्याशी विवाह झाला होता. २००६ मध्ये ती स्पर्धा परीक्षेमध्ये पास होऊन उपनिरीक्षकपदी पुणे येथे रुजू झाली. तेथून सांगली येथे बदली झालेली असताना तिची ओळख पोलीस अधिकारी अभय कुरूंदकर याच्याशी झाली. त्यांच्यामध्ये जवळीकता वाढत गेली. २०१३ मध्ये बढती मिळाली व रत्नागिरीमध्ये बदली झाली. तेथे कर्तव्यावर असताना कुरूंदकर त्यांना भेटण्यासाठी वारंवार जात होता. त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते, परंतु कालांतराने त्यांच्यामध्ये मतभेद होऊ लागले होते.

कुरूंदकरने तिच्या पतीलाही गायब करण्याच्या धमक्या दिल्या होत्या. दरम्यान, तिची बदली नवी मुंबईमध्ये झाली होती. ११ एप्रिल २०१६ मध्ये ती कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये हजर होण्यासाठी घरातून गेली, परंतु प्रत्यक्षात पोलीस स्टेशनपर्यंत पोहचलीच नाही. तिचा भाऊ आनंद बिद्रे यांनी याप्रकरणी कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये अभय कुरूंदकरविरोधात ३१ जानेवारी २०१७ रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानेच महिला अधिकारी यांना बेपत्ता केल्याचा संशय व्यक्त केला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतरही संशयित आरोपी कुरूंदकरला अटक करण्यात आली नव्हती. याप्रकरणाचा नातेवाइकांनी पाठपुरावा केला होता. अश्विनी रत्नागिरीमध्ये असताना कुरूंदकर तिला भेटायला यायचा. त्यादरम्यान त्यांच्यामध्ये भांडणे होऊ लागली होती. भांडणाचे व्हिडीओ तयार करून अश्विनीने ते तिच्या संगणकावर जतन करून ठेवले होते. घरातील सीसीटीव्हीमध्ये दोघांच्या प्रेमाचे व भांडणाचे संवाद चित्रित झाले आहेत. याविषयी व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ठाणे सुरक्षा शाखेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक असलेल्या अभय कुरूंदकरला अटक केली असून पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड करत आहेत.

व्हिडीओ पोलिसांच्या हातीबेपत्ता सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे - गोरे हिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरूंदकर मारहाण करत असल्याचा व्हिडीओ नातेवाइकांनी पोलिसांकडे दिला आहे. त्या व्हिडीओमध्ये रत्नागिरीमधील घरामध्ये कुरूंदकर अश्विनीचा गळा दाबत असल्याचा व हाताने बेदम मारहाण करत असल्याचे दिसत आहे. तिच्या हातामधील मोबाइलही हिसकावून घेतल्याचे दिसत आहे. इतरही अनेक व्हिडीओ तिच्या नातेवाइकांनी पोलिसांकडे दिले आहेत. 

 

टॅग्स :Ashwini Bidre Missingअश्विनी बिद्रे बेपत्ता प्रकरणPoliceपोलिसCourtन्यायालय