वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या कारची काच फोडली

By Admin | Updated: July 9, 2017 02:11 IST2017-07-09T02:11:56+5:302017-07-09T02:11:56+5:30

पनवेल लोहमार्ग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बबन काटकर यांच्या कारची काच फोडून मोबाइलसह चष्मा पळवून नेला आहे. प्रबळगड परिसरातील

Senior police inspector broke the car's glass | वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या कारची काच फोडली

वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या कारची काच फोडली

- लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : पनवेल लोहमार्ग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बबन काटकर यांच्या कारची काच फोडून मोबाइलसह चष्मा पळवून नेला आहे. प्रबळगड परिसरातील धबधब्याजवळ हा प्रकार घडला असून, याविषयी नवीन पनवेल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरामध्ये कारची काच फोडून आतील किमती साहित्य चोरून नेणाऱ्या टोळ्यांनी धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत सामान्य नागरिकांना चोरट्यांचा त्रास होत होता. आता पोलिसांनाही त्यांचा फटका बसू लागला आहे. पनवेल लोहमार्ग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांना ट्रेकिंगची आवड आहे. पोलीस स्टेशनचे काम संपल्यानंतर वेळ मिळाला की सह्याद्रीच्या कडे-कपारीतील गड-किल्ल्यांवर ट्रेकिंगसाठी जात असतात. २९ जून रोजी ते पोलीस स्टेशनमधील पोलीस शिपाई गणेश पवार यांच्याबरोबर प्रबळगडाच्या पायथ्याशी भटकंती करण्यासाठी गेले होते. गडाच्या पायथ्याशी गेल्यानंतर जवळच धबधबा असल्याची माहिती त्यांना मिळाली. पुढे गेल्यानंतर एक ठिकाणी अनेक मोटारसायकल उभ्या करण्यात आल्याचे निदर्शनास आले. काही तरुण तेथे गप्पा मारत बसले होते. वाहन येथेच उभे करून एक किलोमीटर चालत जावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. इतरांच्या सांगण्यावरून काटकर यांनी गडाच्या पायथ्याशी त्यांची कार एमएच १२ सीके १८५१ उभी केली होती. दुपारी ३ वाजता जाऊन दोघेही ४ वाजता परतल्यानंतर त्यांना धक्का बसला. अज्ञात व्यक्तींनी कारच्या काचेवर दगड मारून काचेचे तुकडे पडले होते. कारमध्ये ठेवलेला ओपो कंपनीचा ११ हजार रुपयांचा मोबाइल व लावरेन्स अ‍ॅण्ड मायो कंपनीचा ११ हजार रुपये किमतीचा गॉगलही चोरीला गेला आहे.

Web Title: Senior police inspector broke the car's glass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.