..तर डीजे होणार जप्त!

By Admin | Updated: August 29, 2016 04:33 IST2016-08-29T04:33:47+5:302016-08-29T04:33:47+5:30

सातपाटी सागरी पोलीस स्टेशन अंतर्गत तेरा गावाच्या हद्दीतील गणपती बाप्पाच्या आगमनाच्या व विसर्जनाच्या मिरवणुकीत तसेच उत्सवात डीजे लावण्यास मनाई आहे

..but seized to be DJ! | ..तर डीजे होणार जप्त!

..तर डीजे होणार जप्त!

पालघर : सातपाटी सागरी पोलीस स्टेशन अंतर्गत तेरा गावाच्या हद्दीतील गणपती बाप्पाच्या आगमनाच्या व विसर्जनाच्या मिरवणुकीत तसेच उत्सवात डीजे लावण्यास मनाई आहे. तिचे उल्लंघन केल्यास डीजे जप्त केला जाईल, असा इशारा सहा.पो.नि.किशोर शिंदे यांनी दिला.
गणपती उत्सवाला ५ सप्टेंबर पासून सुरु वात होत असून पोलीस स्टेशन अंतर्गत १४२ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि ३७४ घरगुती मूर्तीची स्थापना करण्यात येते. हा उत्सव शांततेत आणि आनंदात साजरा करता यावा या साठी सातपाटीसागरीपोलीस स्टेशन अंतर्गत माहीम, वडराई, शिरगाव, सातपाटी, मुरबे,नांदगाव,नवापूर,उच्छेळी-दांडी,ई, तेरा गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या प्रतिनिधींची सभा काल सातपाटी च्या काशिनाथ भाई पागधरे सभागृहात पार पडली. या वेळी अत्यंत सुबद्ध पद्धतीने विसर्जन करणाऱ्या सीआरपी मंडळ,उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्र म साजरे करणारे बामणी पाडा मंडळ, उत्कृष्ट देखव्यासाठी नवापूर, तर एक गाव एक गणपती साठी आलेवाडी गावाला बक्षिसाचे वितरण करण्यात आले. गावागावांत दिसून येणारे खड्डे,कचऱ्याचे ढीग दूर करण्यासाठी संबंधीत ग्रामपंचायतींना उपाययोजना करण्याच्या सूचना करून विद्युत वितरणने विद्युत पुरवठा खंडित होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्याचे लेखी पत्र दिल्याची माहिती शिंदे यांनी यावेळी दिली. आरोग्याला त्रासदायक ठरणाऱ्या डीजेवर यावेळी पूर्णत: बंदी असून त्याचा वापर झाल्यास डीजे जप्त केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला. मद्यपान करून धुडगूस घालणाऱ्या वर आळा घालण्याच्या दृष्टीन ड्राय डे असूनही परिमट रूम,बिअर शॉपी,घराघरातून चोरट्या पद्धतीने बिअर,व्हिस्की विकणाऱ्या वर कडक कारवाई साठी धाडी घालण्यात येणार आहेत. (वार्ताहर)

Web Title: ..but seized to be DJ!