धक्का लागल्याच्या वादातून हाणामारी; तुर्भे स्टोअरची घटना
By सूर्यकांत वाघमारे | Updated: September 26, 2022 19:06 IST2022-09-26T19:05:41+5:302022-09-26T19:06:24+5:30
चायनीज सेंटरच्या ठिकाणी पार्सल घेण्यासाठी आलेल्या तरुणाचा त्याच परिसरातील तरुणाला धक्का लागल्याने झालेल्या वादातून हाणामारीची घटना घडली आहे.

धक्का लागल्याच्या वादातून हाणामारी; तुर्भे स्टोअरची घटना
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : चायनीज सेंटरच्या ठिकाणी पार्सल घेण्यासाठी आलेल्या तरुणाचा त्याच परिसरातील तरुणाला धक्का लागल्याने झालेल्या वादातून हाणामारीची घटना घडली आहे. रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास तुर्भे स्टोअर येथे हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुर्भे स्टोअर येथे राहणाऱ्या गणेश शिंदे सोबत हा प्रकार घडला आहे. रविवारी रात्री तो चायनीज सेंटरवर पार्सल घेण्यासाठी गेला होता. यावेळी जुबेर राईन याला त्याचा धक्का लागला. त्यामुळे राईन याने शिवीगाळ केल्याने त्यांच्यात वाद झाला होता. त्यातूनच राईन हा त्याच्या साथीदारांना घेऊन तिथे आला असता त्याने लाकडी दांडक्याने त्याला मारहाण केली. यावेळी शिंदेच्या मदतीला त्याचे मित्र आले असता त्यातले दोघे जखमी झाले आहेत. या हाणामारीत चायनीज सेंटरची देखील तोडफोड झाली आहे. त्यानुसार तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.