पटांगणावर उत्सवांची शाळा
By Admin | Updated: September 25, 2015 02:13 IST2015-09-25T02:13:21+5:302015-09-25T02:13:21+5:30
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या फारच थोड्या शाळांना पटांगण लाभले आहे. त्यात येथील महापालिकेच्या खडेगोळवलीतील गोदाताई परूळेकर शाळेचे पटांगण सदैव उत्सव आणि समारंभासाठी दिले जात

पटांगणावर उत्सवांची शाळा
प्रशांत माने, कल्याण
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या फारच थोड्या शाळांना पटांगण लाभले आहे. त्यात येथील महापालिकेच्या खडेगोळवलीतील गोदाताई परूळेकर शाळेचे पटांगण सदैव उत्सव आणि समारंभासाठी दिले जात असल्याने ते विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होत नाही. पटांगणाची रचना खेळण्यासाठी असताना त्याचा वापर खाजगी कार्यक्रमांसाठी अधिक होत असल्याने आम्ही खेळायचे तरी कुठे असा सवाल? विद्यार्थ्यांनी केला आहे.
भाडेतत्त्वावर पटांगण उपलब्ध करून काही प्रमाणात उत्पन्न महापालिकेला मिळत असले तरी विद्यार्थी खेळापासून वंचित राहत आहेत. विशेष बाब म्हणजे ते वापरणाऱ्यांकडून काही प्रमाणात शाळेतील काही वस्तूंचे नुकसान होण्याचेही प्रकार घडले आहेत. परंतु, याकडे शिक्षण मंडळ प्रशासनाचे पुरते दुर्लक्ष झाले आहे.
मराठी माध्यमाच्या या शाळेची स्थापना १९६३ सालची आहे. २००७-१२ या कालावधीत शाळेच्या वास्तूचे नुतनीकरण केले. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण याठिकाणी दिले जाते. सध्याची पटसंख्या ३१० असली तरी एकेकाळी ती ६०० च्या आसपास होती. शाळेच्या १ कि.मी परिसरात ७ ते ८ खाजगी शाळा आहेत. याचा परिणाम महापालिका शाळेच्या पटसंख्येवर झाला असून याठिकाणी शिक्षकांची असलेली कमतरता हे देखील पट कमी होण्यास कारण ठरले आहे. येथे ८ शिक्षक कार्यरत आहेत आणखी २ शिक्षकांची आवश्यकता आहे. इयत्तांचा आढावा घेता पहिलीत १७, दुसरीत २४, तिसरीमध्ये ४५, चौथीत ४१, सहावीत ६४ तर सातवीत ५६ विद्यार्थी आहेत. बालवाडीत ४० विद्यार्थी आहेत. वह्या, पाठयपुस्तके, रेनकोट, गणवेश असे बहुतांश शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना मिळाले आहे.
शालेय पोषण आहार आणि चिक्की देखील नियमितपणे मिळत असून तळमजला अधिक दोन मजली वास्तूत पिण्याच्या पाण्याची आणि प्रसाधनगृहाची सुविधा चांगल्याप्रकारे आहे. उपलब्ध ६ खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना बसायला पुरेसे
बेंचेस आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधीच्या पुढाकाराने ही वास्तू उभी राहीली आहे.