मावळसाठी संजोग वाघेरे, उरणसाठी मनोहर भोईरच; जनसंवाद मेळाव्यात ठाकरे यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 15:03 IST2024-03-06T15:03:30+5:302024-03-06T15:03:51+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदारसंघातील उरण विधानसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सोमवारी रात्री उशिरा जनसंवाद यात्रा झाली. द्रोणागिरी नोडमधील शांतेश्वरी मैदानावर आयोजित मैदानावरील सभेत त्यांनी ही घोषणा केली.

मावळसाठी संजोग वाघेरे, उरणसाठी मनोहर भोईरच; जनसंवाद मेळाव्यात ठाकरे यांची घोषणा
उरण : मावळ लोकसभा मतदारसंघातून संजोग वाघेरे-पाटील यांची तर उरण विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार मनोहर भोईर यांची उमेदवारी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उरण येथील जनसंवाद मेळाव्यात जाहीर केली. महाविकास आघाडीतील ठाकरे गटाच्या उमेदवारांची ही पहिलीच घोषणा आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदारसंघातील उरण विधानसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सोमवारी रात्री उशिरा जनसंवाद यात्रा झाली. द्रोणागिरी नोडमधील शांतेश्वरी मैदानावर आयोजित मैदानावरील सभेत त्यांनी ही घोषणा केली.
दरवेळी गुजरात राज्यातील बंदरातच अमली पदार्थांचे साठे कसे सापडतात? तुम्हाला सत्ता मिळावी म्हणून तर लोकांना अमली पदार्थांच्या नशेत गुंतवताय का, असा सवालही त्यांनी केला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेश सचिव प्रशांत पाटील, मावळ लोकसभा मतदारसंघाचे संघटक संजोग वाघेरे-पाटील, माजी आमदार मनोहर भोईर यांचीही भाषणे झाली. याप्रसंगी शेकापचे आमदार जयंत पाटील, जे. एम. म्हात्रे, काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, बबनदादा पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.