शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

नवी मुंबईमध्ये पहिल्या दिवशी 18 वर्षांवरील 183 जणांना दिली लस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 01:15 IST

२०० जणांनी केली होती नोंदणी : १५ मिनिटांत बुकिंग पूर्ण, एकाच केंद्रावर लसीकरण

ठळक मुद्देशासनाने १८ वर्षांवरील नागरिकांना १ मेपासून लस देण्याची घोषणा केली होती. परंतु लसीचा तुटवडा असल्याने प्रत्यक्षात लसीकरण सुरू होणार की नाही याविषयी साशंकता व्यक्त केली जात होती

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शासनाच्या सूचनेप्रमाणे नवी मुंबईमध्येही १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले. मात्र लसीचा तुटवडा असल्याने एकच केंद्र सुरू केले असून, पहिल्या दिवशी २०० जणांनी नोंदणी केली. त्यापैकी १८३ जणांना देण्यात आली. अश्विनी थोन्टाकुडी (वय २८) यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला.

शासनाने १८ वर्षांवरील नागरिकांना १ मेपासून लस देण्याची घोषणा केली होती. परंतु लसीचा तुटवडा असल्याने प्रत्यक्षात लसीकरण सुरू होणार की नाही याविषयी साशंकता व्यक्त केली जात होती. लसीकरण पुढे ढकलण्यात येणार असल्याचेही बोलले जात होेते. परंतु शेवटच्या क्षणी ठाणे जिल्ह्यात ५ केंद्रे सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. यामध्ये नेरूळ सेक्टर १५ मधील माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालयाचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या ‘कोविन’ पोर्टलवर रीतसर नोंदणी केल्यानंतर व त्यावर केंद्र निवडून अपॉइंटमेंट आरक्षित केल्यानंतरच संबंधितांचे लसीकरण केले जात आहे. 

रात्री उशिराने सदर पोर्टलवर अपॉइंटमेंट बुकिंग लिंक प्रदर्शित झाल्यावर १५ मिनिटांतच पहिल्या दिवसाच्या २०० लाभार्थ्यांनी अपॉइंटमेंट आरक्षित केली. या लाभार्थ्यांचे लसीकरण रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर स्थापित बूथमध्ये कोविड सुरक्षा नियमांचे पालन करून दुपारी १ वाजता सुरू करण्यात आले.१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी लस घेण्यासाठी शासकीय निर्देशानुसार ‘कोविन पोर्टल’वर रीतसर नोंदणी करणे अनिवार्य आहे. केवळ ऑनलाइन नोंदणी केलेल्या नागरिकांचेच लसीकरण केले जाणार आहे. ही नोंदणी झाल्यानंतर पोर्टलवर आपल्या सोयीचे लसीकरण केंद्र निवडून त्या ठिकाणी दिनांक निवडून आपली अपॉइंटमेंट आरक्षित करावयाची आहे; आणि त्या वेळेला, त्या केंद्रावर जाऊन लस घ्यावयाची आहे, असे महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्या