संदीप नाईकांचा ज्येष्ठ नागरिकाशी संवाद
By Admin | Updated: October 3, 2014 01:13 IST2014-10-03T01:13:04+5:302014-10-03T01:13:04+5:30
ऐरोली मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप नाईक यांनी गुरूवारी सकाळी वाशी सेक्टर 29 येथील स्व.राजीव गांधी उद्यानात मॉर्निग वॉकला आलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला.

संदीप नाईकांचा ज्येष्ठ नागरिकाशी संवाद
>नवी मुंबई : ऐरोली मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप नाईक यांनी गुरूवारी सकाळी वाशी सेक्टर 29 येथील स्व.राजीव गांधी उद्यानात मॉर्निग वॉकला आलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला.
ज्येष्ठ नागरिकांनी संदीप नाईक यांचे आदरपूर्वक स्वागत करून आगामी विधानसभा निवडणुकीच्या विजयासाठी शुभेच्छा दिल्या. आमदार म्हणून संदीप नाईक यांनी चांगली कामे केली आहेत आणि जे चांगली कामे करतात, त्यांनाच मतदार विजयी करतात, असे मत ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले. राजीव गांधी उद्यानानंतर नाईक यांनी वाशी येथील मिनी सीशोअर येथील ज्येष्ठ आणि इतर नागरिकांना भेट दिली. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिकांनी ओपन जीम आणि निवारा शेडची (गजेबो) मागणी त्यांच्याकडे केली. आमदार निधीतून ऐरोली सेक्टर 15 येथे पहिला इकोफ्रेंडली जॉगिंग ट्रॅक साकारला आहे. त्याच धर्तीवर येथेही जॉगिंग ट्रॅक उभारावा अशी मागणी यावेळी ज्येष्ठांनी नाईक यांच्याकडे केली. यावेळी नाईक यांच्या समवेत नगरसेवक (प्रभाग-45) प्रभाकर भोईर, समाजसेवक शशिकांत राऊत, परिवहनचे सदस्य रामनाथ भोईर, समाजसेवक प्रल्हाद भोईर आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
नुकसानग्रस्तांची चौकशी
सोसाटय़ाच्या वा:यासह मुसळधार पावसाने बुधवारी नागरिकांची दैना उडवली. ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर शहरातील अनेक घरांचे नुकसानही झाले. संदीप नाईक यांनी आज नोसील नाका, महापे हनुमान नगर, o्रमिक नगर, कोपरखैरणो प्रभाग क्रमांक 34, प्रभाग क्रमांक 24, घणसोली प्रभाग क्रमांक 25 या परिसराचा दौरा करून नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली आणि तातडीने मदत करण्याच्या सूचना त्यांनी ग्रीन होप या सामाजिक संस्थेला दिल्या.