ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या धर्मपत्नी माईसाहेब सातारकर यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 13:13 IST2023-02-02T13:12:48+5:302023-02-02T13:13:25+5:30
ज्येष्ठ किर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या सुविद्य पत्नी रूक्मिणी सातारकर यांचे अल्पशा अजाराने नेरूळ नवी मुंबई येथे निधन झाले.

ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या धर्मपत्नी माईसाहेब सातारकर यांचे निधन
नवी मुंबई:
ज्येष्ठ किर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या सुविद्य पत्नी रूक्मिणी सातारकर यांचे अल्पशा अजाराने नेरूळ नवी मुंबई येथे निधन झाले. त्या ८५ वर्षाच्या होत्या. अध्यात्माच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी बाबामहाराजांसोबत त्यांनी सक्रिय योगदान दिले आहे. त्यांच्या पार्थिवावर नेरूळमधील स्मशानभूमीत सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सातारकर परिवाराचे निकटवर्ती माजी नगरसेवक शिवराम पाटील यांनी दिली.