नवी मुंबई : अल्पवयीन मुलाचे अपहरण करून २० लाखांची खंडणी मागणाऱ्या चौघांना गुन्हे शाखा पोलिसांनी सोमवारी बेड्या ठोकल्या. या आराेपींनी अपहरण केलेल्या मुलाच्याच इन्स्टाग्रामवरून वडिलांच्या इन्स्टाग्रामवर व्हाइस नोट पाठवून खंडणी मागितली होती. त्यानुसार मुलाच्या सुटकेसाठी दीड लाख रुपये आरोपींना दिले होते. २० लाख दिले नाहीत, तर मुलाची हत्या करू, अशी धमकी त्यांना देत होते.
क्लासला जाण्यासाठी घराबाहेर पडेल्या १७ वर्षीय मुलाचे रविवारी ऐरोली परिसरातून अपहरण करण्यात आले. अपहरणकर्त्यांनी वडिलांकडे इन्स्टाग्रामवरून २० लाख रुपये मागितले होते. अन्यथा मुलाला ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी तक्रार मिळताच रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपासाला गती दिली होती. त्यासाठी गुन्हे शाखा सहायक आयुक्त अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष एकचे वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत, सहायक निरीक्षक नीलेश बनकर, उपनिरीक्षक अभय काकड, अजहर मिर्झा, विशाल सावरकर, भारत सानप, विश्वास भोईर यांचे पथक तपास करत होते.
मुलीच्या नावाने मैत्रीतपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्हीमधून कडी-कडी जोडून कल्याण गाठले. त्या ठिकाणी एका फ्लॅटमधून अपहृत अल्पवयीन मुलाची सुटका करून प्रदीप जैस्वाल (२३), विशाल पासी (१९), चंदन मौर्या (१९) व सत्यम यादव (१९) यांना अटक करण्यात आली. आरोपींनी मुलीच्या नावाने इन्स्टाग्रामवरून पीडित अल्पवयीन मुलासोबत मैत्री वाढवली होती.
Web Summary : Navi Mumbai police arrested four for kidnapping a minor and demanding ₹20 lakh ransom via Instagram. The kidnappers threatened to kill the boy if the money wasn't paid. Police rescued the boy from Kalyan and arrested the accused who befriended him using a fake profile.
Web Summary : नवी मुंबई पुलिस ने एक नाबालिग का अपहरण कर इंस्टाग्राम के माध्यम से ₹20 लाख की फिरौती मांगने के आरोप में चार लोगों को गिरफ्तार किया। अपहरणकर्ताओं ने पैसे न देने पर लड़के को जान से मारने की धमकी दी। पुलिस ने कल्याण से लड़के को छुड़ाया और आरोपियों को गिरफ्तार किया, जिन्होंने फर्जी प्रोफाइल का उपयोग करके उससे दोस्ती की थी।