पावसामुळे शहरातील रस्त्यांची चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 23:32 IST2019-07-11T23:31:10+5:302019-07-11T23:32:05+5:30
वाहनचालकांचे हाल : रस्त्यांची डागडुजी करण्याची मागणी

पावसामुळे शहरातील रस्त्यांची चाळण
नवी मुंबई : शहरात काही दिवसांपासून दाखल झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. यामुळे वाहनचालकांचे हाल होत असून वाहनांचेही नुकसान होत आहे. पावसाळ्यापूर्वी काही ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून रस्त्यांची डागडुजी करण्यात आली होती, या दुरुस्ती केलेल्या रस्त्यावरही खड्डे पडले आहेत. महापालिकेने खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
मुंबईसह राज्यात गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. नवी मुंबई शहरातील सर्वच नोडमधील अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. स्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे जागोजागी पावसाचे पाणी साचत असून वाहनचालकांना नाहक त्रास सहन कराना लागत आहे. जास्त प्रमाणात होणाऱ्या पावसात रस्त्यावर सर्वत्र पाणी साचत असल्याने वाहनचालकांना रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नाही, त्यामुळे वाहने खड्ड्यात आदळत आहेत.
खड्ड्यांमुळे रस्त्यावर पसरलेल्या बारीक वाळूमुळे दुचाकी घसरून अपघात होण्याच्या घटनाही घडत आहेत. सानपाडा कारशेडकडे जाणाºया जुईनगर येथील फाटकाजवळील रस्त्याची पावसाळ्यापूर्वी डागडुजी करण्यात आली होती; परंतु या ठिकाणी पुन्हा खड्डे पडले आहेत. सानपाडा रेल्वे स्थानकाजवळून पामबीच मार्गाला जोडणाºया रस्त्यावर तसेच घणसोली येथील सबवे जवळील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. महापालिकेने रस्त्यांची डागडुजी करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.