मृत्यूचा वाढता दर चिंताजनक; दोन महिन्यांत १५० बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 12:51 AM2021-04-19T00:51:54+5:302021-04-19T00:52:10+5:30

नवी मुंबई पालिकेच्या उपाययोजना अपयशी

The rising death rate is alarming | मृत्यूचा वाढता दर चिंताजनक; दोन महिन्यांत १५० बळी

मृत्यूचा वाढता दर चिंताजनक; दोन महिन्यांत १५० बळी

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रूग्णांच्या दैनंदिन वाढीमुळे आरोग्य सुविधांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण सुध्दा घटले आहे. यातच कोरोनामुळे रूग्ण दगावण्याचे प्रमाण सुध्दा चिंताजनक आहे. 
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून सर्वांगीण प्रयत्न सुरू आहेत. मात्र मृत्यूदर रोखण्यात प्रशासनाला सपशेल अपयश आले आहे. कारण मागील दोन महिन्यात जवळपास दीडशे जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
नवी मुंबईत कोरोनाची स्थिती भयावह बनली आहे. दररोज हजार ते दीड हजार रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडत आहे. यातच ऑक्सिजन बेडची कमतरता आणि रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा आदी मुळे अनेक रूग्णांची परवड होत आहे. परिणामी मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. फेब्रुवारी २०२१ पर्यंत मृत्यू दर कमी करण्यात महापालिकेला चांगलेच यश आले होते. विशेष म्हणजे या कालावधीत दैनंदिन मृत्यूचा आकडा शून्यावर आला होता. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूचा दर वाढत आहे. मागील काही दिवसांपासून सरासरी ५ ते ९ रूग्ण दगावत आहेत. त्यामुळे कोरोनाची लागण झालेल्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या वर्षी मृत्यूदर रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने सक्षम उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची समिती गठित केली होती. त्यामुळे मृत्यूदर कमालीचा खाली आला होता. परंतु कोरोनाची दुसरी लाट अधिक धोकादायक ठरत असतानाही प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाहीत. विशेष म्हणजे ३ जानेवारी २०२१ रोजी एकूण कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या १०५९ इतकी होती. मात्र मागील तीन महिन्यात मृतांचा आकडा १२६० इतका झाला आहे. तर १८ फेब्रुवारी २०२१ ते १७ एप्रिल २०२१ या दोन महिन्याच्या कालावधीत जवळपास दीडशे जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांत व त्यांच्या नातेवाईकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

ठोस पावले उचलण्याची गरज 
nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येचा आलेख वेगाने वाढत आहे. पूर्वी दिवसाला कोरोनामुळे दोन ते तीन जणांचा मृत्यू होत असे. परंतु आता हा आकडा आता ९पर्यंत पोहोचला आहे. 
nएकूणच हा मृत्युदर चिंताजनक व भयावह आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने त्यादृष्टीने ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी स्पष्ट 
केले आहे. 
nनाईक यांनी शनिवारी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना यासंदर्भात पत्र पाठवून मृत्युदर कमी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत.
 

Web Title: The rising death rate is alarming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.