रुग्णालय उद्घाटनास विरोध

By Admin | Updated: August 12, 2014 04:07 IST2014-08-12T04:07:58+5:302014-08-12T04:07:58+5:30

नेरूळ येथील महापालिकेच्या माताबाल रुग्णालयाचे विस्तारीकरण करून त्याचे सामान्य रुग्णालयात रूपांतर करण्यात आले आहे.

Resistance to the hospital inauguration | रुग्णालय उद्घाटनास विरोध

रुग्णालय उद्घाटनास विरोध

नवी मुंबई : नेरूळ येथील महापालिकेच्या माताबाल रुग्णालयाचे विस्तारीकरण करून त्याचे सामान्य रुग्णालयात रूपांतर करण्यात आले आहे. या नवीन रुग्णालयातील बाह्य रुग्ण सेवेचा आज पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. दरम्यान, या कार्यक्रमात काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याने पोलिसांनी २५ जणांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.
नेरूळ सेक्टर १५ येथील महापालिकेचे माँसाहेब मीनाताई ठाकरे माताबाल रुग्णालय आहे. नेरूळ परिसरातील रहिवाशांची गरज लक्षात या रुग्णालयाचे सामान्य रुग्णालयात रूपांतर करण्यात आले आहे. सध्या रुग्णालयाच्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र आरोग्यविषयक सुविधांची पूर्तता करणे बाकी आहे. असे असले तरी नागरिकांची गैरसोय होऊ नये या हेतूने प्रशासनाने पहिल्या टप्प्यात या रुग्णालयात बाह्य रुग्ण सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार आज या सेवेचा पालकमंत्री नाईक यांच्या हस्ते
शुभारंभ करण्यात आला. या वेळी महापौर सागर नाईक यांच्यासह उपमहापौर अशोक गावडे,
स्थायी समितीचे सभापती सुरेश कुलकर्णी, सभागृह नेते अनंत सुतार, कार्यक्रमाचे निमंत्रक तथा आरोग्य समितीचे सभापती संदीप सुतार, उपसभापती शिल्पा मोरे, काँग्रेसच्या नगरसेविका अनिता शेट्टी आदी उपस्थित होते.

Web Title: Resistance to the hospital inauguration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.