शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

सिडकोतील प्रमुख पदांचा खांदेपालट; एस. एच. महावरकर दक्षता अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 1:29 AM

सिडकोच्या सेवेत तीन सह व्यवस्थापकीय संचालक आणि एक पोलीस महासंचालक दर्जाचे मुख्य दक्षता अधिकारी, असे पाच आयएएस दर्जाचे अधिकारी कार्यरत आहेत.

नवी मुंबई : राज्यातील सर्वांत श्रीमंत महामंडळ म्हणून सिडकोची ओळख आहे, टाळेबंदीच्या काळात सिडकोचे कामकाज ठप्प झाले आहे. असे असतानाही राज्य सरकारने सिडकोत कार्यरत असलेल्या आय.ए.एस. दर्जाच्या सर्वच अधिकाऱ्यांच्या बदल्या करून त्या ठिकाणी नवीन नियुक्त्या केल्या आहेत.सिडकोच्या सेवेत तीन सह व्यवस्थापकीय संचालक आणि एक पोलीस महासंचालक दर्जाचे मुख्य दक्षता अधिकारी, असे पाच आयएएस दर्जाचे अधिकारी कार्यरत आहेत. माजी व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र यांची गेल्या महिन्यात बदली करण्यात आली. त्यांच्या रिक्त जागेवर डॉ. संजय मुखर्जी यांची नेमणूक करण्यात आली आहे, तर सह व्यवस्थापकीय संचालक (१) डॉ. प्रशांत नारनवरे आणि सह व्यवस्थापकीय संचालक (२) अशोक शिनगारे यांची गेल्या आठवड्यात बदली करण्यात आली आहे. अशोक शिनगारे यांच्या जागेवर कैलाश शिंदे या सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.एस. एच. महावरकर दक्षता अधिकारीकाही महिन्यांपासून रिक्त असलेल्या सह व्यवस्थापक संचालक (३) या पदावर एस. एस. पाटील यांची तर नागपूर पोलीस आयुक्तालयात अप्पर पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असलेले एस. एच. महावरकर यांची सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

टॅग्स :cidcoसिडको