शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

नवी मुंबई, उरणमधील पाच पाणथळ जागा आरक्षित करा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2020 1:44 AM

वनविभागाच्या मुंबई मॅनग्रोव्हज सेलचे आदेश : सिडको अधिकारी, ठाणे, रायगड जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

मधुकर ठाकूरउरण : तालुक्यातील पाणजे-डोंगरी, बेलपाडा, भेंडखळ तर नवी मुंबईतील सीवूड परिसरातील चाणक्य ट्रेनिंग स्कूल, एनआरआय कॉम्प्लेक्स आदी पाच ठिकाणी दुर्मीळ पक्ष्यांच्या वास्तव्यासाठी उपयुक्त असलेल्या आणि पर्यावरणाचा समतोल राखणाºया मॅनग्रोव्हजची वाढ होण्यासाठी आवश्यक ठरत सलेल्या पाणथळ, दळी जमिनींच्या सरंक्षण, संवर्धनाची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे पाणथळी, दळी जागांचे आरक्षण जाहीर करण्याबाबत सिडको अधिकारी व ठाणे, रायगड जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश वनविभागाच्या मुंबई मॅनग्रोव्हज सेलने दिले आहेत.

नवी मुंबई, उरणमध्ये असलेल्या पाणथळी आणि दळी जागा विकासाच्या नावाखाली नष्ट करण्यात आलेल्या आहेत. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त असलेली कांदळवन लुप्त झाली आहेत. त्याशिवाय कांदळवन, पाणथळी आणि दळी जागा उच्च जैविकता आणि विविध प्रकारच्या पक्ष्यांसाठी आश्रयस्थाने बनली आहेत. पर्यावरण आणि पक्ष्यांच्या संरक्षणासाठी असलेल्या पाणथळ आणि दळी जागा विकासाच्या नावाखाली नष्ट होत चाललेल्या आहेत. त्यामुळे त्याचे विपरीत परिणाम आता दिसू लागले आहेत.बॉम्बे नॅशनल हिस्ट्री आॅफ सोसायटी या निसर्ग संस्थेच्या अहवालानुसार कांदळवन, पाणथळी, दळी जागा नष्ट झाल्याने नवी मुंबई व उरण परिसरात पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. परिणामी, पर्यावरणाचा ºहास होत आहे.

उच्च जैवविविधतेचे प्रमाणही घटले आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि पक्ष्यांच्या वाढीसाठी पाणथळ, दळी जमिनींच्या सरंक्षण, संवर्धनाची आवश्यकता निर्माण झाली असल्याचा अभिप्रायही नोंदविण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी काही संस्थांनी न्यायालयातही दाद मागितली आहे.कांदळवनांच्या संवर्धनाची आवश्यकताया पार्श्वभूमीवर नवी मुंबई, उरण परिसरात अत्यंत महत्त्वाच्या पाच ठिकाणी पाणथळ, दळी जागा शिल्लक आहेत. यामध्ये उरण तालुक्यातील पाणजे-डोंगरी येथील पश्चिम भाग, बेलपाडा गावाकडील उत्तर-पश्चिम भाग, भेंडखळ गाव हद्दीतील दक्षिण भाग तर नवी मुंबईतील सीवूड परिसरातील चाणक्य ट्रेनिंग स्कूल परिसरातील भाग, सीवूड परिसरातील एनआरआय कॉम्प्लेक्स आदी पाच ठिकाणी पाणथळी दळी जागा उपलब्ध आहेत. दुर्मीळ पक्ष्यांच्या वास्तव्यासाठी उपयुक्त असलेल्या आणि पर्यावरणाचा समतोल राखणाºया मॅनग्रोव्हजची वाढ होण्यासाठी आवश्यक ठरत असलेल्या या पाचही पाणथळी, दळी जमिनींच्या सरंक्षण, संवर्धनाची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे पाणथळी, दळी जागांचे आरक्षण, सरंक्षण, संवर्धन जाहीर करण्याबाबत सिडको अधिकारी व ठाणे, रायगड जिल्हाधिकाºयांना अहवाल सादर करण्याचे आदेश वनविभागाच्या मुंबई मॅनग्रोव्हज सेलचे अ‍ॅडिशन व प्रिन्सिपल चिफ कॉन्झरवेटर विरेंद्र तिवारी यांनी दिले आहेत.