नवी मुंबई, उरणमधील पाच पाणथळ जागा आरक्षित करा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 01:44 AM2020-05-07T01:44:31+5:302020-05-07T01:44:41+5:30

वनविभागाच्या मुंबई मॅनग्रोव्हज सेलचे आदेश : सिडको अधिकारी, ठाणे, रायगड जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Reserve five wetlands in Uran, Navi Mumbai | नवी मुंबई, उरणमधील पाच पाणथळ जागा आरक्षित करा

नवी मुंबई, उरणमधील पाच पाणथळ जागा आरक्षित करा

Next

मधुकर ठाकूर
उरण : तालुक्यातील पाणजे-डोंगरी, बेलपाडा, भेंडखळ तर नवी मुंबईतील सीवूड परिसरातील चाणक्य ट्रेनिंग स्कूल, एनआरआय कॉम्प्लेक्स आदी पाच ठिकाणी दुर्मीळ पक्ष्यांच्या वास्तव्यासाठी उपयुक्त असलेल्या आणि पर्यावरणाचा समतोल राखणाºया मॅनग्रोव्हजची वाढ होण्यासाठी आवश्यक ठरत सलेल्या पाणथळ, दळी जमिनींच्या सरंक्षण, संवर्धनाची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे पाणथळी, दळी जागांचे आरक्षण जाहीर करण्याबाबत सिडको अधिकारी व ठाणे, रायगड जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश वनविभागाच्या मुंबई मॅनग्रोव्हज सेलने दिले आहेत.

नवी मुंबई, उरणमध्ये असलेल्या पाणथळी आणि दळी जागा विकासाच्या नावाखाली नष्ट करण्यात आलेल्या आहेत. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त असलेली कांदळवन लुप्त झाली आहेत. त्याशिवाय कांदळवन, पाणथळी आणि दळी जागा उच्च जैविकता आणि विविध प्रकारच्या पक्ष्यांसाठी आश्रयस्थाने बनली आहेत. पर्यावरण आणि पक्ष्यांच्या संरक्षणासाठी असलेल्या पाणथळ आणि दळी जागा विकासाच्या नावाखाली नष्ट होत चाललेल्या आहेत. त्यामुळे त्याचे विपरीत परिणाम आता दिसू लागले आहेत.
बॉम्बे नॅशनल हिस्ट्री आॅफ सोसायटी या निसर्ग संस्थेच्या अहवालानुसार कांदळवन, पाणथळी, दळी जागा नष्ट झाल्याने नवी मुंबई व उरण परिसरात पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. परिणामी, पर्यावरणाचा ºहास होत आहे.

उच्च जैवविविधतेचे प्रमाणही घटले आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि पक्ष्यांच्या वाढीसाठी पाणथळ, दळी जमिनींच्या सरंक्षण, संवर्धनाची आवश्यकता निर्माण झाली असल्याचा अभिप्रायही नोंदविण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी काही संस्थांनी न्यायालयातही दाद मागितली आहे.

कांदळवनांच्या संवर्धनाची आवश्यकता
या पार्श्वभूमीवर नवी मुंबई, उरण परिसरात अत्यंत महत्त्वाच्या पाच ठिकाणी पाणथळ, दळी जागा शिल्लक आहेत. यामध्ये उरण तालुक्यातील पाणजे-डोंगरी येथील पश्चिम भाग, बेलपाडा गावाकडील उत्तर-पश्चिम भाग, भेंडखळ गाव हद्दीतील दक्षिण भाग तर नवी मुंबईतील सीवूड परिसरातील चाणक्य ट्रेनिंग स्कूल परिसरातील भाग, सीवूड परिसरातील एनआरआय कॉम्प्लेक्स आदी पाच ठिकाणी पाणथळी दळी जागा उपलब्ध आहेत. दुर्मीळ पक्ष्यांच्या वास्तव्यासाठी उपयुक्त असलेल्या आणि पर्यावरणाचा समतोल राखणाºया मॅनग्रोव्हजची वाढ होण्यासाठी आवश्यक ठरत असलेल्या या पाचही पाणथळी, दळी जमिनींच्या सरंक्षण, संवर्धनाची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे पाणथळी, दळी जागांचे आरक्षण, सरंक्षण, संवर्धन जाहीर करण्याबाबत सिडको अधिकारी व ठाणे, रायगड जिल्हाधिकाºयांना अहवाल सादर करण्याचे आदेश वनविभागाच्या मुंबई मॅनग्रोव्हज सेलचे अ‍ॅडिशन व प्रिन्सिपल चिफ कॉन्झरवेटर विरेंद्र तिवारी यांनी दिले आहेत.

Web Title: Reserve five wetlands in Uran, Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.