प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

By Admin | Updated: January 28, 2017 03:05 IST2017-01-28T03:05:18+5:302017-01-28T03:05:18+5:30

प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शासकीय इमारती, शाळा, महाविद्यालये, कार्यालये, सोसायट्या, सामाजिक संस्था,

Republic Day Celebrations Celebrated | प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

नवी मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शासकीय इमारती, शाळा, महाविद्यालये, कार्यालये, सोसायट्या, सामाजिक संस्था, राजकीय पक्षांच्या वतीने ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. यानिमित्त शाळा-महाविद्यालयातील स्काऊट गाईड, एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी पथसंचलनाच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाला सलामी दिली.
नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय तसेच विभागीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी महापौर सुधाकर सोनावणे, उपमहापौर अविनाश लाड,आयुक्त तुकाराम मुंढे, विधी समिती सभापती गणेश म्हात्रे, आरोग्य समिती सभापती सलुजा सुतार, नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, नगरसेविका नेत्रा शिर्के, सरोज पाटील, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण,रमेश चव्हाण व इतर विभागप्रमुख उपस्थित होते. या ध्वजारोहणप्रसंगी शहरातील बाइकर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनानिमित्त २५ ते २७ जानेवारी या कालावधीत महापालिका मुख्यालयाला तिरंगा रंगाची रोषणाई करण्यात आली होती. त्याचे क्षणचित्रे टिपण्यासाठी नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Republic Day Celebrations Celebrated