शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

मुख्यमंत्री येणार असल्यामुळे एपीएमसीमध्ये दुरुस्तीची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 12:35 AM

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २५ सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांसह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २५ सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांसह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. यामुळे मार्केटमधील खड्डे दुरुस्ती, नालेसफाई व इतर कामे युद्धपातळीवर करण्यात येत आहेत.महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त माथाडी कामगारांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, चंद्रकांत पाटील व राज्यातील इतर अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर बाजार समिती प्रशासनाने कांदा - बटाटा मार्केटमध्ये रस्ता दुरुस्ती व इतर कामे सुरू केली आहेत. लिलावगृहाच्या परिसरातील गटारांमधील गाळ काढला जात आहे. मलनि:सारण वाहिन्या साफ करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा मागविण्यात आली होती. रस्त्यावरील खड्ड्यांचीही दुरुस्ती केली जात होती. वास्तविक कांदा बटाटा मार्केटमधील रोडची दुरवस्था झाली आहे. गटारांमध्ये गाळ साचला आहे. मलनि:सारण वाहिन्यांमधून पाण्याचा योग्यपद्धतीने निचरा होत नाही. येथील कामे करण्यासाठी व्यापाऱ्यांनी अनेक वेळा पाठपुरावा केल आहे. परंतु मार्केटची पुनर्बांधणी करण्याचे कारण सांगून दुरुस्तीची कामे केली जात नाही. मुख्यमंत्री येणार असल्यामुळे येथील कामे केली जात असल्यामुळे व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. परंतु इतर वेळीही व्यापाºयांच्या समस्या अशाचप्रकारे युद्धपातळीवर सोडविण्यात याव्यात अशीही अपेक्षाही व्यक्त केली आहे.