शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

घरकूल इमारतींची होणार दुरुस्ती; श्रमिकनगरमधील १७३ सदनिकाधारकांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 1:46 AM

श्रमिकनगरमध्ये तीन मजल्याच्या सहा इमारती उभारण्यात आल्या आहेत.

नवी मुंबई : श्रमिकनगरमध्ये महापालिकेने २००७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आवास योजनेअंतर्गत १७३ सदनिकांचे बांधकाम केले आहे. सद्यस्थितीमध्ये दुरवस्था झालेल्या या इमारतींची दुरुस्ती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, यासाठी दोन कोटी २८ लाख रुपये खर्च होणार आहेत.श्रमिकनगरमध्ये तीन मजल्याच्या सहा इमारती उभारण्यात आल्या आहेत. या इमारतींच्या काही भागांचे प्लास्टर निघाले आहे. आरसीसी बांधकामाच्या काही भागास तडे गेले आहेत. मलनि:सारण वाहिनी नादुरुस्त झाली आहे. बाहेरील भागाचे प्लास्टर व रंगकाम खराब झाले आहे. येथे राहणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊ लागली आहे. अद्याप येथे गृहनिर्माण सोसायटीची स्थापना करण्यात आलेली नाही. यामुळे देखभालीची जबाबदारी महापालिकेची आहे. लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली होती.इमारतींची दुरुस्ती न केल्यास येथील बांधकाम धोकादायक होण्याची शक्यता निर्माण झाली होती. यामुळे महापालिका प्रशासनाने तत्काळ दुरुस्तीचा निर्णय घेतला आहे. इमारतीमधील प्लास्टर करणे, रंगकाम, बाहेरील प्लास्टर, लादी बसविणे, दरवाजे, स्ट्रक्चरल स्टील, गेट, वॉटर प्रुफिंग, मायक्रो काँक्रीटची कामे केली जाणार आहे. स्थायी समितीने दोन कोटी २८ लाख ८० हजार रुपये खर्चाच्या कामास मंजुरी दिली आहे. आठ महिन्यांत या वसाहतींना नवीन झळाळी प्राप्त होणार असून त्यामुळे रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई