शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
4
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
5
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
6
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
7
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
8
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
9
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
10
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
11
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
12
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
13
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
14
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
15
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
16
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
17
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
18
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
19
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
20
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
Daily Top 2Weekly Top 5

हातगाडीच्या विळख्यातून कर्जतकरांची सुटका

By admin | Updated: July 8, 2017 05:52 IST

हातगाडीच्या विळख्यातून कर्जतकरांची सुटका झाली आहे. रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मुख्य रहदारीच्या मार्गावरील वाहतुकीला

लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : हातगाडीच्या विळख्यातून कर्जतकरांची सुटका झाली आहे. रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मुख्य रहदारीच्या मार्गावरील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या हातगाड्यांवर कर्जत नगरपरिषद आणि पोलीस ठाणे यांनी संयुक्त कारवाई करून हटविल्या आहेत. त्या जागेवर नव्याने रिक्षा स्टॅण्ड उभारण्यात आले आहे. यामुळे सद्यस्थितीत तरी हातगाडीच्या विळख्यातून कर्जतकरांची सुटका झाली आहे. वाहतुकीस होणारा अडथळा लक्षात घेऊन मागील काळात एमएमआरडीएच्या माध्यमातून कोट्यवधी रु पये खर्च करून रस्त्याचे रुंदीकरण करून ते सिमेंट काँक्र ीटचे करण्यात आले. त्याच वेळेस रस्ता रंदीकरणाला अडथळा ठरणारी कर्जत उपजिल्हा रु ग्णालयाची कित्येक मीटर लांब असलेली भली मोठी संरक्षित भिंत जमीनदोस्त करण्यात आली. त्यानंतर आतातरी वाहतूककोंडीच्या समस्येतून सुटका होईल, अशी कर्जतकरांना अपेक्षा होती. तसेच ज्या ठिकाणची संरक्षक भिंत हटविली त्या ठिकाणी नगरपरिषद प्रशासनाने रिक्षाचालकांसाठी नवे रिक्षा स्टॅण्ड उभारले; परंतु या रिक्षा स्टॅण्डच्या जागेवर हातगाडीवाल्यांनी कब्जा केल्याने रिक्षाचालकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील कचेरीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत रिक्षा उभ्या केल्या. या अनधिकृत थांब्यामुळे चौकात वाहतूककोंडीची समस्या वारंवार निर्माण होऊ लागली. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी यावर आक्षेप घेत, कर्जत पालिका प्रशासन आणि कर्जत पोलीस ठाणे यांच्याकडे नवीन रिक्षा स्टॅण्डच्या जागेत ठाण मांडून बसलेल्या हातगाडीवाल्यांना हटवून अनधिकृत थांब्यावरील रिक्षा या नवीन रिक्षा स्टॅण्डमध्ये उभ्या कराव्यात, अशी मागणी मागील कित्येक महिन्यांपासून लावून धरली होती. या संदर्भात कर्जत नगरपरिषद प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि पोलीस अधिकाऱ्यांची अनेक वेळा चर्चा झाली होती; परंतु प्रत्यक्षात कार्यवाही होत नव्हती. अखेर नव्याने रु जू झालेल्या पोलीस निरीक्षक सुजाता तनावडे यांनी आक्रमक भूमिका व पुढाकार घेत, पालिका प्रशासनाच्या सहकार्याने या हातगाडीवाल्यांना गुरु वारी सकाळी तेथून हटवत रिक्षा स्टॅण्डची जागा मोकळी केली. त्यानंतर या मोकळ्या झालेल्या स्टॅण्डमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील रिक्षाचालकांनी नव्या स्टॅण्डमध्ये रिक्षा उभ्या केल्यामुळे या चौकातील वाहतूककोंडीची समस्या काही अंशी नक्कीच दूर झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. हातगाड्यांवर केलेली कारवाई स्वागतार्ह असली, तरी या नंतरच्या काळात पुन्हा हातगाडीवाल्यांनी तेथील परिसरात ठाण मांडू नये, याची दक्षता घेणे पालिका प्रशासनाने तेवढेच गरजेचे आहे. या कारवाईच्या वेळी नगरसेवक राजेश लाड, उपनगराध्यक्ष राहुल डाळिंबकर, नगरसेवक सोमनाथ ठोंबरे आदींसह नगरपालिका कर्मचारी उपस्थित होेते. हातगाडीवाल्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील कारवाईप्रमाणेच बाजारपेठेतीलही विनापरवाना हातगाडीवाल्यांनाही हटविल्यास रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या प्रवाशांचीही गैरसोय दूर होईल.- योगेश वैद्य, नागरिक.