शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

रिलायन्सला ‘मनसे’ ब्रेक, प्रकल्पग्रस्तांच्या फसवणूकीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2018 06:54 IST

प्रकल्पग्रस्तांची फसवणूकीचा आरोप : जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट

पालघर : रिलायन्स गॅस पाईपलाइन प्रकल्पातील प्रकल्पग्रस्ताना सर्वोच्च मोबदला व प्रादेशिक परिवहन कार्यालय पालघर येथे सुरू करणे तसेच वर्सोवा पूल संदर्भात प्रशासकीय स्तरावर त्वरित धोरणात्मक निर्णय घेण्या बाबत गुरु वारी मनसेचे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांची भेट घेतली. या प्रकरणी मनसेने शड्डू ठोकल्याने आगामी काळात खळखट्याक आंदोलनाची सुरुवात होते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

कंपनीने संबंधित प्रकल्पग्रस्तांना रु पये ५९ हजार ८४० प्रती गुंठा देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. परंतु हा दर देण्यास रिलायन्स कंपनीने असमर्थता दाखिवल्याचे जिल्हाधिकारी नारनवरे यांनी मनसे शिष्टमंडळास सांगितले. तेंव्हा संखे यांनी संताप व्यक्त करीत ५९ हजार ८४० प्रती गुंठा दर ही आर्थिक फसवणूक झालेल्या प्रकल्पग्रसतांना मान्य नसल्याचे सांगून, जर ही रिलायन्स कंपनी मनमानी पध्दतीने काम करणार असेल तर मनसे या कंपनीच्या अधिकाºयांच्या विरोधात उभी ठाकेल असे सांगितले. तसेच बाधित प्रकल्पग्रसतांना सर्वोच्च मोबदला देण्या संदर्भात शासनाची भूमिका कचखाऊ असल्याचा टोला संखे यांनी लगावला.सर्वसामान्य जनतेला, वाहनधारकांना होणारा त्रास, वेळेचा होणारा अपव्यय आणि आर्थिक बाजू वाचेल अशी सर्व समावेशक भूमिका मनसेने घेत पालघर येथे प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले होते. या बाबतीत प्रशासनाची भूमिका सकारात्मक असून येत्या आठवड्यात शासन निर्णय अपेक्षित असल्याचे डॉ. नारनवरे यांनी मनसे शिष्टमंडळास सांगितले.

मुंबई अहमदाबाद महामार्गावर घोडबंदर नजीक असलेल्या वर्सोवा पुलाला तडे गेल्याचे कित्येक वर्षापूर्वी निदर्शनास येऊनही त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना न करता केवळ डागडुजी करून वाहतूक सुरू ठेवण्याची मलमपट्टी शासन करीत असल्याची टीका जिल्हाध्यक्षानी केली. तसेच पुला संदर्भात कोणताही धोरणात्मक निर्णय न घेता सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळण्याचा प्रशासनाचा डाव कोणाच्या आर्थिक फायद्यापोटी खेळला जातोय का? अशी शंका संखे यांनी यावेळी व्यक्त केली.वर्सोवा पुलाचे काम २५ डिसेंबरपर्यत पूर्णच्वर्सोवा पुला बाबत काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने विलंब होत असल्याचे मान्य करून, येत्या पंधरा दिवसात याबाबतीत सुरू असलेले काम २५ डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिल्याचे डॉ. नारनवरे यांनी सांगितले.च्यावेळी शिष्टमंडळात मनकासेचे जिल्हा सचिव अनंत दळवी, तलासरी अध्यक्ष सुनील ईभाड, पालघर अध्यक्ष मंगेश घरत, पालघर शहर अध्यक्ष सुनिल राऊत, शहर सचिव शैलेश हरमळकर, शहर अध्यक्षा गीता संखे उपस्थित होते.

टॅग्स :Relianceरिलायन्सMumbaiमुंबईMNSमनसे