शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

वृद्धेला दाखल करून घेण्यास नकार, नेरुळमधील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 23:52 IST

नेरुळ येथील एका ९३ वर्षीय महिलेला देखभालीसाठी वृद्धाश्रमात ठेवण्यात आले होते. तिथल्या एका कर्मचाऱ्याला कोरोना झाल्याने वृद्धांची चाचणी केली असता, या ९३ वर्षीय महिलेलाही कोरोना झाल्याचे समोर आहे.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : अंथरुणाला खिळून असलेल्या वृद्धांची देखभाल शक्य नसल्याच्या कारणावरून वृद्धांना पालिका रुग्णालयात दाखल करून घेतले जात नसल्याचे समोर आले आहे.नेरुळ येथील एका ९३ वर्षीय वृद्ध महिलेला कोरोना झाल्याने त्यांना पालिका रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका आली होती, परंतु त्या अंथरुणाला खिळून असल्याचे समजताच, कोविड सेंटरमध्ये देखभाल शक्य नसल्याच्या कारणावरून रुग्णवाहिका रिकामी परत गेली.नेरुळ येथील एका ९३ वर्षीय महिलेला देखभालीसाठी वृद्धाश्रमात ठेवण्यात आले होते. तिथल्या एका कर्मचाऱ्याला कोरोना झाल्याने वृद्धांची चाचणी केली असता, या ९३ वर्षीय महिलेलाही कोरोना झाल्याचे समोर आहे. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी पालिकेला कळविले असता, त्यांना कोविड सेंटरमध्ये घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका पाठवण्यात आली. परंतु रुग्णवाहिका दारात आली असता, त्या अंथरुणाला खिळून असल्याचे समजताच रुग्णवाहिकेसोबत असलेल्या कर्मचाºयाने त्यांना सोबत घेऊन जाण्यास नकार दिला. यासाठी अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांची देखभाल त्या ठिकाणी शक्य नसल्याचे कारण देण्यात आले.या घटनेमुळे सदर महिलेचे कुटुंबीय दोन दिवसांपासून चिंतेत आहेत. खासगी रुग्णालयात उपचार परवडणारे नसल्याने पालिका रुग्णालयातच उपचार मिळविण्यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत. यासाठी लोकप्रतिनिधींसह काही पालिका अधिकाऱ्यांशीही त्यांनी संपर्क साधला. यावेळी एका महिला अधिकाºयाने रुग्णाच्या देखभालीसाठी एका नातेवाइकाने सोबत राहण्याचा सल्ला दिला असता, त्याचीही तयारी कुटुंबीयांनी दाखविली, परंतु यानंतरही प्रशासनाकडून शुक्रवारी संध्याकाळपर्यंत त्यांना कसलाही प्रतिसाद मिळाला नाही.खासगी रुग्णालयातून फोनवर फोनकोरोनाबाधित रुग्णाची माहिती खासगी रुग्णालयांना व्यवसायाच्या उद्देशाने पुरविली जात असल्याची शक्यता आहे. नेरुळच्या या वृद्ध महिलेला न घेता रुग्णवाहिका परत जाताच, महिलेच्या नातेवाइकांना वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांतून फोनवर फोन सुरू झाले. फोन करणाºयांकडून आपले रुग्णालय कसे सोइस्कर आहे हे सांगून, रुग्णाला आपल्याच रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला जात होता. मात्र, त्यांच्यापर्यंत रुग्ण व कुटुंबीयांची माहिती पोहोचली कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईhospitalहॉस्पिटलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस