स्थगित विषयांना परस्पर मंजुरी

By Admin | Updated: April 23, 2016 02:15 IST2016-04-23T02:15:10+5:302016-04-23T02:15:10+5:30

पनवेल नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत काही इतिवृत्तांना विरोध असताना ते मंजूर करून नगरपरिषदेतील सत्ताधारी व काही विरोधकांनी मनमानी कारभार

Reciprocal approval for suspended subjects | स्थगित विषयांना परस्पर मंजुरी

स्थगित विषयांना परस्पर मंजुरी

पनवेल : पनवेल नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत काही इतिवृत्तांना विरोध असताना ते मंजूर करून नगरपरिषदेतील सत्ताधारी व काही विरोधकांनी मनमानी कारभार चालविला असल्याचा आरोप नगरसेवक रमेश गुडेकर यांनी केला आहे. सभेत एकूण ७८ विषय होते. त्यापैकी ७ विषयांना स्थगिती देण्यात आली होती. मात्र हे विषय परस्पर मंजूर केल्याचा आरोपही गुडेकर यांनी केला आहे.
१७ डिसेंबर २०१५ रोजीच्या इतिवृत्ताला गटनेते नगरसेवक रमेश गुडेकर यांनी विरोध दर्शविला होता. त्यावेळी शहरातील लिमये सार्वजनिक ग्रंथालयाने मागितलेल्या १ लाखाच्या अनुदानाबाबत निर्णय होणार होता. मात्र वाचनालयाने अतिक्र मण केले असून आधी अतिक्रमण हटवावे त्यानंतरच अनुदानाबाबत निर्णय घ्यावा, असे गुडेकर यांनी सुचविले होते. छत्रपती संभाजी महाराज मैदानालगत बांधलेल्या सिध्दिविनायक कॉम्प्लेक्सला पर्यायी रस्ता उपलब्ध करु न देण्याबाबत चर्चा होऊन हा विषयही तहकूब करण्यात आला. मात्र २२ मार्चच्या सर्वसाधारण सभेत हा परस्पर मंजूर करण्यात आला.
अमरधाम स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी ८,४९,५४८ रुपयांच्या वाढीव खर्चाबाबत चर्चा करण्यात आली आणि हा विषयही स्थगित ठेवण्यात आला. रोजबाजाराच्या सुरक्षा भिंतीच्या दुरुस्तीसाठी येणाऱ्या ७,७४,१८५ खर्चाला विरोध दर्शविण्यात आला होता. परंतु मागील इतिवृत्तामध्ये तो मंजूर केलेला आहे.
शहरी भुयारी गटार योजनेसाठी वाढीव बिलाला हरकत घेण्यात आली होती. कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे हे काम लांबल्यामुळे त्याला बिलापोटी वाढीव रक्कम देण्यास विरोध होता. तसेच ठेकेदारास बिले अदा करु नयेत, तरी सुध्दा सदर ठेकेदाराला तब्बल १० कोटींचे वाढीव बिल देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
महानगर गॅस लिमिटेड यांना देण्यात आलेल्या परवानगीप्रमाणे भाडे आकारण्याबाबत सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीमध्ये याबाबत निर्णय झालेला नाही. सदरचा विषय तहकूब ठेवण्यात आलेला असताना यामागील इतिवृत्तामध्ये ठराव करण्यात आलेला नसल्याने ही सभागृहाची दिशाभूल असल्याचा आरोप करण्यात येत आहे. शिवसेना जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार असल्याचेही गुडेकर म्हणाले.

Web Title: Reciprocal approval for suspended subjects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.