अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात राजीव गोरे यांची एकाकी झुंज यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 18:40 IST2025-04-05T18:40:01+5:302025-04-05T18:40:38+5:30
अश्विनी बिद्रे हत्याकांडात आरोपींनी हा खटला कमकुवत करण्यासाठी अनेक प्रकारची शक्कल लढवली.

अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात राजीव गोरे यांची एकाकी झुंज यशस्वी
वैभव गायकर
पनवेल- अश्विनी बिद्रे हत्याकांडात आरोपींनी हा खटला कमकुवत करण्यासाठी अनेक प्रकारची शक्कल लढवली. मुख्य आरोपी अभय कुरुंदकर हे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी असल्याने त्यांनी त्यांच्या अनुभवाचा फायदा घेत या हत्याकांडाला वेगळे वळण देण्याचे प्रयत्न केले, मात्र अश्विनी बिद्रे यांचे पती राजीव गोरे यांनी याप्रकरणी जिद्दीला पेटून याप्रकरणी एकाकी झुंज दिली. याप्रकरणी नवी मुंबई पोलीसांनी काहीच दखल घेतली नाही म्हणून पती राजू गोरे यांनी उच्च न्यायालयात 4 ऑक्टोबर 2016 रोजी याचिका दाखल केली.
27 ऑक्टोबर 2016 रोजी न्या. ए एस ओक आणि ए ए सय्यद यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांना डिसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली टीम नियुक्त करून तत्काळ अहवाल दाखल करण्याचा आदेश दिला. 31 जानेवारी 2017 ला खून करण्याच्या उद्देशून अपहरण करणे आदी बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर वर कंळबोली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल.याच दरम्यान तपास अधिकारी संगिता शिंदे-अल्फान्सो याची बदली झाली. गुन्हा दाखल झाल्यानंतर फेब्रुवारी 2017 पासून ऑक्टोबर 2017 पर्यंत नोकरीवरून कुरुंदकर गायब झाला.
या घटनाक्रमाची माहिती राजीव गोरे सतत समाज माध्यमांना देत असल्याने पोलिसांवर दबाव वाढल्याने तत्कालीन पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यानी 17 नोव्हेंबर 2017 ला सोशल मीडियावर पोष्ट करून आलेल्या बातम्या खोट्या आहेत असे जाहीर केलं.या प्रकरणात हेमंत नगराळे हे आरोपीला मदत करत असल्याचा आरोप गोरे यांनी केला होता.यानंतर 7 डिसेंबर 2017 ला वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर ला संध्याकाळी अटक झाली.
16 जानेवारी 2018 रोजी राष्ट्रपती , आणि मुख्य न्यायमूर्ती भारत सरकार यांना निवेदन करून राजू गोरे आणि 9 वर्षाची मुलगी सिध्दी यांनी न्याय मिळत नसल्यामुळेच ईच्छा मरणाची परवानगी मागितली. याची दखल राष्ट्रपतींनी घेत 25 जानेवारी 2018 ला चीफ सेक्रेटरी महाराष्ट्र राज्य यांना याप्रकरणी लक्ष घालण्याचे निर्देश दिले. न्या. राजेश अस्मर सत्र न्यायाधीश 1 याच्याकडून न्याय मिळणार नाही त्याच्याकडून खटला अन्य कोर्टात चालवावा म्हणून 7 जानेवारी 2020 ला चीफ जस्टीस ऑफ इंडिया नवी दिल्ली याच्याकडे राजीव गोरे यांनी तक्रार केली.
15 जुलै 2016 पासुन आजतागायत याप्रकरणी सतत विषयाचा पाठपुरावा केला.कोल्हापुर ते पनवेल असा प्रवास अनेकवेळा न्यायालयीन प्रक्रियेसाठी केला.मुख्य आरोपी कुरुंदकर याने अनेकवेळा प्रकरणाला वेगळे वळण देण्याचे प्रयत्न केला.मात्र विशेष सरकारी वकील,तपास अधिकारी तसेच मिडीयाने प्रकरणाला वेळोवेळी वाचा फोडण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे आम्हाला न्याय मिळाला आहे.
- राजीव गोरे (अश्विनी बिद्रे यांचे पती )