कळंबोली : आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कळंबोली येथे संपर्क कार्यालय थाटले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी सकाळी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. पक्षाचे मध्यवर्ती संपर्ककार्यालय सेक्टर १ ई येथे सुरू करण्यात आले आहे. देवीचे दर्शन घेतल्यावर त्यांनी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. ठाकरे यांच्यासोबत माजी आमदार नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, जिल्हाध्यक्ष अतुल भगत, उपजिल्हाध्यक्ष अतुल चव्हाण, कळंबोली शहराध्यक्ष राहुल चव्हाण आदी उपस्थित होते.सेक्टर १ ई येथील मोकळ्या भूखंडावर डेब्रीज टाकले होते. त्यामुळे या जागेला डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप प्राप्त झाले होते. मात्र मनसेने याबाबत सिडकोकडे पाठपुरावा केला. याची कार्यकारी अभियंता सुनील कापसे यांनी दखल घेऊन डेब्रीज हटवून भूखंड मोकळा केला. याबाबत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.
मनसे संपर्क कार्यालयाचे राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन
By admin | Updated: October 9, 2016 03:03 IST