शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रेन वॉटर हार्वेस्टिंगकडे पनवेलकरांचे होत आहे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 07:00 IST

पावसाचे छतावर पडणारे पाणी जिरविण्यात बांधकाम व्यावसायिक फाटा देत आहेत. छतावरील लाखो लिटर पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा नसल्यामुळे वाहून जाते. शासनाने पावसाचे पाणी जिरविण्यात प्रभावी भूमिका घेतली असली तरी पावसाचे छतावरील पाणी नागरिकांनी कसे जिरवावे याची जागृती करण्यात यंत्रणा कमी पडत आहे.

- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : पावसाचे छतावर पडणारे पाणी जिरविण्यात बांधकाम व्यावसायिक फाटा देत आहेत. छतावरील लाखो लिटर पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा नसल्यामुळे वाहून जाते. शासनाने पावसाचे पाणी जिरविण्यात प्रभावी भूमिका घेतली असली तरी पावसाचे छतावरील पाणी नागरिकांनी कसे जिरवावे याची जागृती करण्यात यंत्रणा कमी पडत आहे. सध्या पनवेल शहर आणि सिडको वसाहतीत नवीन इमारतींच्या बांधकामात रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा राबविण्यास टाळाटाळ केली जात आहे.पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. एमजेपी, एमआयडीसी ,नवी मुंबई महानगरपालिकेकडून पाणी घेवून पनवेल मनपा आणि सिडको नागरिकांना पाणीपुरवठा करते. परंतु आता कडक उन्हाळा आहे. म्हणून पाणी कमी पडू लागले आहे. त्यातच टाटा पॉवर कंपनी वीजनिर्मिती केंद्र सुटीच्या दिवशी बंद असते. म्हणून पाताळगंगा नदीच्या पात्रात पाणी येत नाही. एमजेपीच्या वाहिन्यांना फुटीचे ग्रहण लागले असल्याने वारंवार शटडाऊन घेतला जातो. देहरंग धरण आटले म्हणून पाणी मिळत नाही. सत्ताधारी विरोधक आणि प्रशासन आपल्या पध्दतीने वेगवेगळ्या यंत्रणांकडे अतिरिक्त पाण्याची मागणी करीत आहेत. मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना होताना दिसत नाहीत.छतावर पडणारे पावसाचे पाणी जिरविण्याची यंत्रणा निर्माण केली जात नाही किंवा याचाही आढावा प्रशासनातर्फे घेतला जात नाही. इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा हवी. त्याचा फायदा थेट इमारतीतील रहिवाशांना होतो. मात्र पनवेल,सिडको वसाहती तसेच समाविष्ट गावांमध्ये ज्या नवीन इमारती उभारण्यात आल्या आहेत किंवा आता काम सुरू आहे तिथेही ही व्यवस्था बसविण्याकरिता उदासीनता दिसून येते. त्यामुळे पावसाचे पाणी नाल्यातून खाडीला जाते. त्याचा काहीही उपयोग होत नाही. पाणीटंचाईवर मात करण्याकरिता रेन वॉटर हार्वेस्टिंग अतिशय चांगला पर्याय असल्याचे मत या क्षेत्रातील अभ्यासक विजय काळे यांनी व्यक्त केले. रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे घराच्या छतावर पावसाळ्यात पडणारे पाणी पाइपाद्वारे टाकीत सोडता येते किंवा बोअरवेल आणि विहिरीत सोडून पाण्याची पातळी वाढवता येते, असेही ते म्हणाले.घरबांधकामातच आहे सिस्टीमचा समावेशशहरात घराचे बांधकाम करण्यापूर्वी महानगरपालिकेच्या नगररचना विभागाकडून बांधकाम आराखड्याची परवानगी घ्यावी लागते. नियमानुसार बांधकामाला परवानगी देण्यात येते. या आराखड्यात रेन वॉटर हार्वेस्टिंगचा समावेश केला आहे. त्याशिवाय आराखड्याला परवानगी दिली जात नाही; परंतु त्याची पाहणी कुणीही करीत नसल्याची खंत अमोल शितोळे यांनी व्यक्त केली आहे.जुन्या इमारतींनाही जोडता येणे शक्यजुन्या शासकीय इमारतींचे पाइप शोषखड्ड्यात सोडून पाणी जिरविण्याची यंत्रणा सक्षम करता येणे शक्य आहे. पंचायत समिती, प्रांत कार्यालय , बांधकाम कार्यालय, महसूल प्रबोधनी, शासकीय वसाहतीत, पोलीस ठाणे येथेही यंत्रणा निर्माण करता येईल; परंतु इतर कारणांसाठी निधी खर्च करणारी ही कार्यालये रेन वॉटर हार्वेस्टिंगवर मात्र खर्च करताना दिसत नाही. तसेच महापालिका क्षेत्रातील जुन्या निवासी इमारतींना सुध्दा लावले जावू शकते. परंतु सोसायटीधारकांकडून उदासीनता दिसून येते.शासनांच्या आदेशानुसार इमारतींना रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा बसविणे बंधनकारक आहे.त्यानुसार आम्ही बांधकाम परवानगी देताना तपासणी करतो. जर ही व्यवस्था असेल तरच भोगवटा प्रमाणपत्र दिले जाते. मात्र सोसायट्यांकडून रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा कार्यान्वित करण्यात उदासीनता दिसून येते.याबाबत जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.- संजय कटेकर,शहर अभियंता,पनवेल महानगरपालिका

टॅग्स :Rainपाऊसnewsबातम्या