पनवेल मध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस; नागरिकांना उकाड्यापासून दिलासा
By वैभव गायकर | Updated: May 13, 2024 17:13 IST2024-05-13T17:12:08+5:302024-05-13T17:13:35+5:30
पनवेल मध्ये मतदानाची धामधूम सुरु असताना दुपारी साडेतीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.

पनवेल मध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस; नागरिकांना उकाड्यापासून दिलासा
वैभव गायकर,पनवेल : सोमवार पनवेल मध्ये मतदानाची धामधूम सुरु असताना दुपारी साडेतीनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.या पावसामुळे गावामानात बदल होऊन गारवा निर्माण झाला होता.
पनवेलचा पारा काही दिवसापासून चांगलाच तापला आहे.मध्यंतरी हा पारा 42 डिग्री पर्यंत पोहचला होता.यामुळे अचानकच्या पावसामुळे नागरिकांची थोडा वेळ का होईना गर्मीपासून सुटका झाली.मोठ्या प्रमाणात वादळी वारा वाहत असल्याने अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याची घटना देखील घडल्या. मोठ्या प्रमाणात सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे पनवेल महानगरपालिकेच्या आपत्कालीन पथक देखील सक्रिय झाले होते. पालिका आयुक्त डॉ प्रशांत रसाळ यांनी तत्काळ आपत्कालीन पथकांना सुचना देऊन शहरात कुठेही अत्यावश्यक परिस्थिती