शहरं
Join us  
Trending Stories
1
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
2
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पिहिली प्रतिक्रिया 
3
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
4
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
5
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
6
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
7
U19 Asia Cup 2025 : कोण आहे Aaron George? पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी ठरला ‘संकटमोचक’
8
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
9
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
10
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
11
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
12
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
13
Nitin Nabin: चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत?
14
सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, १० पर्यटकांचा जीव घेतला
15
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
16
IND vs SA T20I : टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हममधून जसप्रीत बुमराह OUT; कारण...
17
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
18
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
19
पीएम सूर्य घर : मोफत वीज योजनेसाठी कसा करायचा ऑनलाईन अर्ज? सोपी आहे पद्धत, एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
20
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनामध्ये रायगडला पसंती, विदेशी पर्यटकांची घारापुरीकडे ओढ, शासनाचे पर्यटनस्थळांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 04:49 IST

रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळे देश - विदेशातील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरू लागले आहेत. प्रत्येक वर्षी ३० हजार पेक्षा जास्त विदेशी पर्यटक घारापुरी लेण्यांना भेट देत आहेत.

- नामदेव मोरे ।नवी मुंबई : रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळे देश - विदेशातील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरू लागले आहेत. प्रत्येक वर्षी ३० हजार पेक्षा जास्त विदेशी पर्यटक घारापुरी लेण्यांना भेट देत आहेत. राज्यातील ३२६ संरक्षीत स्मारकांपैकी ६५ व ५६६ पर्यटनस्थळांपैकी ५५ रायगड जिल्ह्यात आहेत. पर्यटन उद्योगाला प्रचंड संधी आहे. परंतु शासनाच्या व पुरातत्व विभागाच्या उदासीन धोरणांमुळे अनेक संरक्षीत स्मारकांची व पर्यटनस्थळांची प्रचंड दुरावस्था होवू लागली आहे.देशाच्या व राज्याच्या इतिहासामध्ये रायगड जिल्ह्याचे नाव सुवर्णअक्षरांनी कोरले आहे. मराठा साम्राज्याची राजधानी रायगड किल्ला, महाडचे चवदार तळे, जगाच्या इतिहासामध्ये सहा वर्ष सुरू असलेला चरी -कोपरचा ऐतीहासीक संप याच जिल्ह्यातील. आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके, भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे याच जिल्ह्यातील आहेत. जिल्ह्यामध्ये ८ गड -किल्ले, ९ प्रमुख धार्मीक स्थळे, ८ समुद्र किनारे आहेत. पुरातत्व विभागाने महाराष्ट्रातील ३२६ संरक्षीत स्मारके घोषीत केली असून त्यामध्ये सर्वाधीक ६५ रायगडमध्ये आहेत.महाराष्ट्र शासनाने राज्यातील ५६६ प्रमुख पर्यटनस्थळे घोषीत केली असून त्यामध्येही ५५ या ठिकाणी आहेत. उरण तालुक्यातील घारापुरी लेणी जगप्रसिद्ध असून तेथ दरवर्षी ६ ते ७ लाख पर्यटक भेट देत आहेत. २०१४ - १५ या वर्षामध्ये ६ लाख ३८ हजार देशातील पर्यटकांनी व ३०७१७ विदेशी पर्यटकांनी घारापुरीला भेट दिली आहे. मुंबईत सर्वाधीक पर्यटकांनी भेट दिलेल्या ठिकाणांमध्ये घारापुरीचा समावेश आहे. यानंतर रायगड किल्याला प्रत्येक वर्षी दीड ते दोन लाख पर्यटक भेट देत आहेत.राज्यातील व देशातील प्रमुख पर्यटनस्थळ होण्याची क्षमता रायगडमध्ये आहे. रायगड किल्यासाठी ६०६ कोटीचे पॅकेज जाहीर केले असले तरी इतर पर्यटनस्थळांविषयी ठोस आराखडाच नाही. जंजिरा व इतर किल्यांची स्थिती बिकट होत आहे, गड - किल्यांना भेटी देणाºया पर्यटकांसाठी काहीही सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. किल्यांबरोबर समुद्र किनाºयांचीही स्थिती तशीच आहे. स्थानीक प्रशासन त्यांच्या पद्धतीने पर्यटकांना आकर्षीत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु शासनाने बीच व समुद्र किनाºयांच्या विकासाकडे फारसे लक्ष दिले नाही. यामुळे मुंबई व परिसरातील पर्यटकांना रायगड पेक्षा गोव्याला पसंती मिळू लागली आहे. पर्यटकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. येथील पर्यटनस्थळांची योग्य प्रसिद्धी केली तर पर्यटन हा जिल्ह्यातील प्रमुख उद्योग होवू शकतो. परंतु शासनाकडून यासाठी ठोस प्रयत्नच केले जात नसल्याने क्षमता असूनही रायगडमधील पर्यटन उद्योग अपेक्षीत गतीने वाढत नाही.रायगडचे जिल्हाअधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना जगाच्या नकाशावर घेवून जाण्यासाठी व्हिजन डॉक्युमेट सादर केले आहे. गड - किल्ले व इतर पर्यटनस्थळांच्या विकासाला चालना देण्यास सुरवात केली आहे. त्यांच्या प्रयत्नांना राज्य शासनाने साथ दिल्याने रायगड प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येवू शकते.देवस्थानेशितळादेवी, विक्रम विनायक मंदिर, नांदगावचा श्रीसिद्धिविनायक, पालीचा बल्लाळेश्वर, श्री दत्त मंदिर, चौल -भोवाळे, कनकेश्वर, महडचे श्री वरदविनायक, चौलचे रामेश्वर मंदिर, हरिहरेश्वरप्रमुख पर्यटनस्थळ (गड - किल्ले)कुलाबा, पद्मदुर्ग, सागरगड, उंदेरी, कोर्लई, खंदेरी, जंजिरा, रायगडनवी मुंबईमध्येएकही पर्यटन केंद्र नाही- रायगड जिल्हा राज्यातील प्रमुख पर्यटन केंद्र होत असताना स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाºया नवी मुंबईमध्ये एकही पर्यटन केंद्र नाही. महापालिका कार्यक्षेत्रामधील एकमेव ऐतिहासिक ठिकाण असलेल्या बेलापूर किल्ल्याची दुरवस्था झाली आहे. किल्ला नामशेष होवू लागला आहे. दिवा ते दिवाळेपर्यंत खाडीकिनारा लाभला असून तेथे पर्यटनस्थळ विकसित करण्यात महापालिकेला अपयश आले आहे.- अडवली भुतावलीमध्ये ३५० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रफळावर निसर्ग पर्यटन केंद्र उभारण्यात येणार होते, परंतु तो प्रकल्पही जवळपास रद्द झाला आहे. गवळीदेवसह सर्वच ठिकाणांकडे महापालिकेचे व वनविभागाचे दुर्लक्ष झाले आहे. पर्यटकांनी भेट द्यावी असे एकही ठिकाण महापालिका कार्यक्षेत्रामध्ये नसल्याने शहरवासीयांसह देश - विदेशातून येणारे नागरिकही नाराजी व्यक्त करू लागले आहेत.समुद्रकिनारेकिहिम बीच, काशिद बीच, रेवस बंदर, आक्षी बीच, नागाव बीच, मांडवा बंदर, अलिबाग बीच, रेवदंडा बंदरइतर पर्यटन व महत्त्वाची ठिकाणेभूचुंबकीय वेधशाळा, फणसाड अभयारण्य, नवाबाचा राजवाडा, कुडे लेणी, छत्रीबाग, कान्होजी आंग्रे समाधी, फणसाड धबधबा, ईदगाह मैदान, सवतकडा धबधबा, महाडचे चवदार तळे, गारंबीचे धरण, खोकरी घुमट, घारापुरी लेणीसंरक्षित स्मारकेठिकाण स्मारकआचलोली ०१कुलाबा किल्ला १६आंबिवली लेणी ०१बिरवाडी किल्ला ०१चौल ०७घारापुरी-उरण ०२पनवेल ०१सुरगड ०१घोसाळगड ०१गोमाशी लेणी ०१कडासरी कांगोरी ०२खोपोली लेणी ०१कोल लेणी ०१कोंडाणे ०१कोर्लाली जुना किल्ला ०१कुडा लेणी ०१अवचितगड ०१कासा किल्ला ०१नादसुरू लेणी ०१नागोठणा पूल ०१नेनावली लेणी ०१पाचाड ०२पाला लेणी ०१पेठ ०२रायगड किल्ला १२जंजिरा किल्ला ०१राजापुरी येथील स्तंभ ०१तळा किल्ला ०१