शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाच्या आदल्या रात्री घणसोलीत राडा; पैसे वाटपावरून कार्यकर्ते आमने-सामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 06:27 IST

घणसोलीत पैसे वाटप होत असल्याची तक्रार स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्याने निवडणूक विभागाच्या भरारी पथकाला केली होती.

नवी मुंबई : मतदानाच्या आदल्या रात्री म्हणजेच मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून घणसोलीत दोन गट समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला होता.  याबाबत तक्रारीनंतर भरारी पथक घणसोली सिम्प्लेक्स येथील गणेशकृपा सोसायटीत पोचले असता, त्यांना इमारतीखाली पडलेल्या ५०० रुपयांच्या ३४ नोटा आढळल्या. त्यानंतर बेकायदा जमाव जमवून तणाव निर्माण केल्याप्रकरणी दोन्ही गटांच्या जमावावर गुन्हा दाखल करण्यात आला.

घणसोलीत पैसे वाटप होत असल्याची तक्रार स्वराज पक्षाच्या कार्यकर्त्याने निवडणूक विभागाच्या भरारी पथकाला केली होती. त्यानुसार अधिकारी घटनास्थळी पोहोचले असता, इमारतीमध्ये दोन व्यक्ती वावरताना आढळल्या. 

इतर ठिकाणी राहणाऱ्या या व्यक्ती एवढ्या अपरात्री येथे कशासाठी आल्या होत्या, याची चौकशी करत पथकाने त्यांची झडती घेण्यास सुरुवात केली. तेव्हा, त्यातील एकाला भीतीने भोवळ आली.

यादरम्यान अपक्ष उमेदवार विजय चौगुले आपल्या समर्थकांसह त्याठिकाणी पोहचले. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांचा जमाव होऊन वाद वाढत गेला. अखेर भरारी पथकाने तातडीने रबाळे पोलिसांची जादा कुमक मागवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा निर्णय घेतला.

यावेळी भरारी पथकाने इमारतीच्या मागील बाजूस पाहणी केली असता, त्याठिकाणी ५०० रुपयांच्या ३४ नोटा पडलेल्या आढळल्या. या नोटा भरारी पथकाने जप्त केल्या. तसेच, दोन्ही गटांच्या जमावाविरोधात तक्रारही दाखले केली.

तणावाचा परिणाम मतदानावर !

सुरुवातीला वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही उमेदवारांना तेथून निघून जाण्याच्या सूचना केल्या. मात्र, उमेदवार निघून गेले, तरी त्यांचे समर्थक त्या ठिकाणी थांबूनच राहिले. 

साहजिकच तणाव निवळलाच नाही, उलट आणखी वाढू लागल्याचे चित्र होते. मात्र, अखेर पोलिसांच्या कडक हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. या घटनेमुळे बुधवारी मतदानाच्या दिवशीदेखील परिसरात तणावाचे वातावरण कायम होते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Crime Newsगुन्हेगारीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी